china esakal
ग्लोबल

चीन लवकरच तैवानवर करु शकतो हल्ला !रशियावर बीजिंगचे लक्ष

रशियावर बीजिंगचे लक्ष

सकाळ डिजिटल टीम

बीजिंग : युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर तैवानबाबत चीन कोणती भूमिका घेणार यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. चीनने वारंवार तैवानवर हल्ला करण्याची धमकी दिलेली आहे. यामुळे काहींचे म्हणणे आहे, की हल्ला करण्याची शक्यता वाढली आहे. चला तर चीन काय विचार करत आहे हे जाणून घेऊ या...

चीनचे होऊ शकते आर्थिक नुकसान

युक्रेनवर रशियन हल्ल्यानंतर माॅस्कोवर अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. अशा स्थितीत चीनने जर तैवानवर सैन्य आक्रमण केले तर त्या देशावर कडक निर्बंध लावले जाऊ शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार बीजिंगला जाणीव आहे, की जर तैवानविरुद्ध सैन्य बळाचा वापर केल्यास चीनचे आर्थिक नुकसान रशियापेक्षाही (Russia) अधिक होऊ शकते. मात्र चीनचे (China) आर्थिक आणि वित्तीय भार रशियाच्या तुलनेत अधिक आहे. तरीही चीनवरील निर्बंध अधिक कडक असू शकतो. (China May Plan Invasion On Taiwan)

तैवान युक्रेन नव्हे

गेल्या काही वर्षांमध्ये जगातील अनेक देशांना तैवानकडून सहकार्य मिळत आहे. या बरोबरच तैवानच्या (Taiwan) नागरिकांमध्ये पूर्वीच्या तुलनेत अधिक जागरुकता वाढली आहे. हे चीनसाठी चिंतेचे कारण आहे. सद्यःस्थितीत अमेरिकेचे तैवानवर हवे तसे लक्ष राहिलेले नाही. मात्र युक्रेन युद्धानंतर अमेरिका पुन्हा तैवानवर लक्ष केंद्रीत करु शकतो. चीन मानतो, की तैवान युक्रेन नाही आणि अमेरिका तैवानच्या सुरक्षेसाठी सुरक्षा दलाचा वापर करण्यासाठी अधिक इच्छुक आहे.

तैवान अमेरिकेचा प्यादा बनू इच्छित नाही

वेगवेगळ्या वृत्तांनुसार अमेरिका कशा प्रकारे युक्रेनला फसवत आहे, हे तैवानचे नागरिक पाहात आहेत. अशा स्थितीत तैवान नागरिक अमेरिकेचा प्यादा बनवू इच्छित नाही. तैवान विषयक तज्ज्ञांनुसार, तैवानने युद्धापासून बचाव करावा आणि बीजिंगशी चर्चा करुन प्रश्न सोडवावे. युद्धामुळे दोन्ही पक्षांना मोठ्या प्रमाणावर किंमत मोजावी लागेल. यामुळे तैवान लढाई करु इच्छित नाही.

चीनची सैन्य क्षमता तैवानपेक्षा अधिक

तज्ज्ञ सांगतात, की युक्रेनचा विरोध पाहात पीपल्स लिबरेशन आर्मीलाही आपल्या आकलनावर विचार-विमर्श करणे आवश्यक आहे. मात्र चिनी लष्करी नेत्यांच्या म्हणण्यानुसार चीनची सैन्य क्षमता तैवानच्या तुलनेत कैकपटीने अधिक आहे. यामुळे चीन तैवानवर लवकर विजय मिळवू शकतो. दुसरीकडे तैवानही युक्रेन युद्धावर नजर ठेवून आहे. कारण चीन तैवानवर सैन्य बळाचा वापर करुन नियंत्रण मिळवू शकतो. रशियन सैन्याचे खराब प्रदर्शन चीनी सैन्यासाठी आणखीन अधिक जोखीमपूर्ण होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

आठवडाभरापूर्वी मातृशोक, नितीश राणाने मैदानात उतरत आईला वाहिली अनोखी श्रद्धांजली

Shivsena Hearing: शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं? संजय राऊतांना जिंकण्याचा विश्वास, म्हणाले...

SCROLL FOR NEXT