Corona in china  
ग्लोबल

चीन पुन्हा कोरोनाच्या विळख्यात! तिसऱ्या शहरात लागू केलं लॉकडाऊन

सकाळ डिजिटल टीम

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, आपला शेजारी चीनमध्ये देखील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर वाढताना दिसत आहे. बीजिंगमध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी सुरु असतानाच कोरोना रुग्ण वाढत आहेत, बिघडलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आता प्रशासनाने एनयांग (Anyang City) शहरातही लॉकडाऊन जाहीर केले आहे. या सोबतच आता चीनमध्ये एकूण तीन शहरे आहेत, जिथे कोरोनाच्या वाढत्या केसेसनंतर कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

लॉकडाऊन कुठे कुठे आहे?

हिवाळी ऑलिम्पिकपूर्वी, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चीनमधील शियान आणि तिआनजिन या शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी एनयांगमध्ये देखील कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे, चीनमधील सुमारे 20 मिलीयन लोकांना आता त्यांच्या घरात राहण्यास भाग पाडले जात आहे.

एनयांगची लोकसंख्या सुमारे 55 लाख आहे. हेनान प्रांतातील सर्वात मोठ्या शहरांपैकी हे एक आहे. मिडीया रिपोर्टनुसार शियान आणि टियांजिन बंदरात ओमिक्रॉन क्लस्टर्सचा आढळल्यानंतर हे बंद करण्यात आले होते. पण आता एनयांग मध्ये ओमिक्रॉनची प्रकरणेही वाढताना दिसत आहेत. शनिवारपासून आजपर्यंत, स्थानिक पातळीवर 84 संक्रमित आढळले आहेत, त्यापैकी 58 रुग्ण सोमवारी रात्री ते मंगळवारी सकाळ दरम्यान आढळले आहेत. अशा परिस्थितीत चीन सरकारने आपल्या शून्य कोविड-19 धोरणांतर्गत हे शहर बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

लोकांना घरीच राहण्याच्या सूचना

एनयांग प्रशासनाने सोमवारी रस्त्यावर वाहनांना बंदी घालणारा आदेश जारी केला आणि सर्व लोकांना घरातच राहण्याच्या सूचना दिल्या. यादरम्यान शहरात कोरोना रुग्णांची तपासणी सुरू राहणार आहे. दरम्यान हिवाळी ऑलिंपिक 4 ते 20 फेब्रुवारी दरम्यान बीजिंग येथे होणार आहे. परंतु ओमिक्रॉन व्हेरिएंट जगभरात पसरल्याने चीनमध्येही त्याचा प्रभाव दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT