China releases 10 Indian soldiers after border clash 
ग्लोबल

चीनने केली दहा भारतीय जवानांची सुटका; तीन दिवसांपासूनच्या चर्चेनंतर मार्ग

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवानच्या खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या प्रत्यक्ष ताबारेषेवर मंगळवारी झालेल्या हिंसक झटापटीनंतर लष्करातील ताब्यात घेतलेल्या दहा भारतीय जवानांची चीनने सुटका केली आहे. तीन दिवसानंतर चीनने ही सुटका केली असून यामध्ये दोन मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तीन दिवसांपासून भारतीय आणि चिनी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मंगळवारी झालेल्या झटापटीनंतर तीन गुरुवारी या सैनिकांची सुटका करण्यात आल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या सैनिकांना मुक्त करण्याबरोबर गलवानमधील परिस्थिती सामान्य होण्यासाठी प्रयत्न करण्याबद्दल अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आहे. यासंदर्भात भारतीय लष्कराने अद्याप कोणताही अधिकृत माहिती दिलेली नसली तरी याबाबत पीटीआयने वृत्त दिले आहे. चिनी सैनिकांबरोबर झालेल्या हिंसक झटापटीनंतर कोणताही भारतीय सैनिक बेपत्ता नसल्याची माहिती गुरुवारी भारतीय लष्कराने दिली होती.
---------
पिंपरी-चिंचवडमध्ये लोकप्रतिनीधींच्याही घरात शिरलाय कोरोना; नगरसेवकांनाही लागण
---------
घाबरु नका; तुमच्यासाठी इथे नोकरी उपलब्ध आहे; राज्य शासनाचा उपक्रम
---------
चिनी सीमेवर झालेल्या या हिंसक घटनेमध्ये भारतीय लष्कराच्या एकूण ७६ सैनिकांवर हल्ला करण्यात आला होता. त्यापैकी १८ जणांना गंभीर तर ५८ जणांना किरकोळ स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत. १८ जणांवर लेहमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून इतर ५८ जणांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली आहे. दरम्यान, १९६७ नंतर पहिल्यांदाच भारत चीन सीमेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT