China Corona News esakal
ग्लोबल

China Corona outbreak: चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात 3.7 कोटी रुग्ण आढळल्याचा दावा

या आठवड्यातील एका दिवसांत झालेली ही सर्वाधिक नोंद असल्याचा दावा केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

China Corona outbreak : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार माजला असून एकाच दिवसात या देशात ३७ मिलियन अर्थात ३.७ कोटी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या आठवड्यातील एका दिवसांत झालेली ही सर्वाधिक नोंद आहे. ब्लुमबर्गच्या हवाल्याने इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (China reports 37 million Covid cases in a day shattering global record Report)

ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार, या वर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या २० दिवसात २४८ मिलियन लोक संसर्गबाधित झाले होते. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य कमिशनची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीतील मिनिट्स चीनच्या टॉपच्या अधिकाऱ्यांकडून ब्लुमबर्गला प्राप्त झाले आहेत, याद्वारे त्यांनी वृत्त दिलं आहे.

या वृत्तानुसार, २० डिसेंबर रोजी ३७ मिलियन अर्थात ३.७ कोटी बाधित रुग्णांची एका दिवसात नोंद झाली आहे. ही आकडेवारी चीनच्या अधिकृत टॅलीशी मिळतीजुळती नाहीये. कारण चीनच्या टॅलीनुसार त्या दिवशी फक्त ३,०४९ संसर्गबाधित रुग्णांची नोंद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण जर हा एकाच दिवसात ३७ मिलियन बाधितांचा आकडा खरा असेल तर त्यामुळं यापूर्वी जानेवारी २०२२ रोजी नोंदवलेला ४ मिलियन बाधितांचा रेकॉर्ड मोडणार आाहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

चीनने आपल्या शून्य-कोविड धोरणात बदल केल्यानंतर काही आठवड्यांनंतर संक्रमणामध्ये वाढ होत आहे. चीनमधील कोरोना उद्रेकाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत. यामध्ये रुग्णालयांचे भीषण चित्र दिसत आहे, कारण आरोग्य सेवांवर प्रचंड ताण आलेला दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT