india china army esakal
ग्लोबल

चीन : भारताच्या सीमेवर परिस्थिती स्थिर, आज दोन्ही देशांत चर्चा

सकाळ डिजिटल टीम

चीनच्या (china) जिनपिंग सरकारने (Xi Jinping) सांगितले की, भारताच्या सीमेवर (india border) सध्याची परिस्थिती स्थिर आहे, तसेच आज दोन्ही देशांमधील कमांडर स्तरावर चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. चीनने (china) 12 जानेवारी रोजी भारतासोबत (india) होणाऱ्या कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेत आपला सहभाग निश्चित केला आहे. यासोबतच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतासोबतच्या सीमावर्ती भागातील सध्याची परिस्थिती स्थिर असल्याचे म्हटले आहे.

आज दोन्ही देशांत चर्चा

चीनच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूर्व लडाखमधील उर्वरित संघर्षाच्या ठिकाणांवरून सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेवर कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची 14 वी फेरी बुधवार, 12 जानेवारी रोजी होणार आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, "दोन्ही बाजूंच्या सहमतीनुसार, चीन आणि भारत 12 जानेवारी रोजी चीनच्या सीमेला लागून असलेल्या मालदो येथे कमांडर स्तरावरील चर्चेची 14वी फेरी आयोजित करतील.' "सध्या, सीमावर्ती भागातील परिस्थिती एकंदरीत स्थिर आहे आणि दोन्ही बाजू लष्करी माध्यमांद्वारे चर्चा करत आहेत," ते म्हणाले.

नवी दिल्लीतील संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "भारत आणि चीन यांच्यात 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LC) चीनच्या बाजूने चुशुल-मोल्डो येथे चर्चा होणार आहे. ते म्हणाले की, हा चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू असेल.

डेपसांग बुल्ग आणि डेमचोक येथील समस्यांचे निराकरण करण्यासह, संघर्षाच्या उर्वरित सर्व ठिकाणांहून भारत लवकर सैन्य मागे घेण्यावर दबाव टाकेल अशी अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे, 10 ऑक्टोबर 2021 रोजी दोन्ही देशांमधील लष्करी चर्चेची 13 वी फेरी झाली आणि त्यात समस्याचे निराकरण झाले नाही.

पूर्व लडाख सीमेवर 5 मे 2020 रोजी पॅंगॉन्ग लेक परिसरात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर उद्भवली. यानंतर लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवरील चर्चेमुळे पॅंगॉन्ग लेक आणि गोगरा भागातील उत्तर आणि दक्षिणेकडील किनाऱ्यांवरील सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी दोन्ही बाजूंनी पूर्ण झाली. LAC च्या संवेदनशील भागात सध्या दोन्ही देशांचे प्रत्येकी 50,000 ते 60,000 सैनिक आहेत असे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT