China threatens Australia; Australia responded with harsh word 
ग्लोबल

चीनची ऑस्ट्रेलियाला धमकी; ऑस्ट्रेलियाने दिले जोरदार प्रत्युत्तर

वृत्तसंस्था

कॅनबेरा- चिनी पर्यटक आणि विद्यार्थ्यांद्वारे देशाला मिळणारे राजस्व रोखण्याची धमकी चिनने ऑस्ट्रेलियाला दिली होती. यावर ऑस्ट्रेलियाने कडक शब्दात चीनला प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, असं म्हणत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी पलटवार केला आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियामध्ये चिनी लोकांवरील हल्ले वाढले आहेत. त्यामुळे चीन संतापला असून ऑस्ट्रेलियाला असे नक्षलवादी हल्ले रोखण्यास सांगितलं आहे. तसेच चिनी लोकांनी ऑस्ट्रेलियामध्ये पर्यटनासाठी जाऊ नये असा सल्ला दिला आहे. तसेच चिनी विद्यार्थ्यांकडून ऑस्ट्रेलियाला मिळाणारा राजस्व रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक ताणले गेले आहेत. 
--------
दिल्लीतील जामा मशिद 'या' तारखेपर्यंत बंदच 
--------
कोरोनावर औषध तयार; दहा देशांकडून औषधांची मागणी
--------
पंतप्रधान मॉरिसन यांनी यांनी एका मुलाखतीमध्ये चीनवर पलटवार केला आहे. चीनने केलेला दावा हास्यास्पद आहे आणि त्याचा स्वीकार केला जाऊ शकत नाही. चीनसोबत आमचे महत्वपूर्ण व्यापारी संबंध आहेत, आणि ते आम्ही पुढे चालू ठेवू इच्छितो. पण चीनने दिलेल्या धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही, असं मॉरिसन म्हणाले आहेत.  

चीन हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा व्यापारी भागेदार देश आहे. त्यामुळे चीनने विद्यार्थ्यांना दिलेल्या सूचना ऑस्ट्रेलियावर मोठा प्रभाव पाडू शकतात. गेल्या काही दिवसांपासून चीन आणि ऑस्ट्रेलियामधील संबंध ताणले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाने कोरोना विषाणूची उत्पत्ती आणि त्याची हाताळणी याबाबत आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे चीन ऑस्ट्रेलियावर नाराज झाला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमधील संबंध अधिक बिघडत चालले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT