china vs taiwan leaked audio clip exposes xi jinping mission taiwan 1.40 lakh troops 953 ships  
ग्लोबल

तैवानवर हल्ल्यासाठी ड्रॅगनची जोरात तयारी, चीनची ऑडिओ क्लिप लीक

सकाळ डिजिटल टीम

चीन संपूर्ण ताकदीनिशी तैवानवर हल्ल्याची योजना आखत असून तैवानवर हल्ल्याची योजना आखत असलेल्या चिनी अधिकाऱ्यांची एक ऑडिओ क्लिप लीक झाली आहे. रिपोर्टनुसार, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने हा ऑडिओ लीक केला असून ज्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख नेते आणि चिनी आर्मी पीएलएचे उच्च अधिकारी तैवानवर कब्जा करण्याची योजना आखत आहेत.

तैवान आक्रमणावर चर्चा करतानाची चीनच्या सर्वोच्च लष्करी अधिकार्‍यांची ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी चीनला इशारा दिला आहे. मंगळवारच्या क्वाड समिटच्या आधी सध्या टोकियोमध्ये असलेले बिडेन म्हणाले की, चीनने आक्रमण केल्यास त्यांचा देश तैवानचे लष्करी रक्षण करेल.

तैवानवर बळजबरीने ताबा मिळवण्याच्या चिनी प्रयत्नाविरूद्ध अमेरिकन लष्कर हस्तक्षेप करेल का? असा प्रश्न बायडेन यांना विचारले असता ते म्हणाले, “आम्ही हेच वचन एक चीन धोरणाशी सहमत आहोत, आम्ही त्यावर स्वाक्षरी केली आहे. मात्र, चीन तैवानवर बळजबरीने मालकी हक्क दाखवू शकत नसून, ही कल्पना योग्य नाही. चीनला तैवान बळजबरीने ताब्यात घेण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

चीनमध्ये जन्मलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर हेंग यांनी ट्विट केलेल्या व्हायरल ऑडिओ क्लिपने बीजिंगमध्ये खळबळ उडाली आहे. यूट्यूब चॅनल LUDE मीडियाद्वारे पोस्ट करण्यात आलेली ही 57-मिनिटांची क्लिप आहे. त्यामुळे तैवानवर हल्ल्याची योजना आखत असलेल्या चिनी अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप लीक झाल्यानंतर अमेरिकेने तैवानच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

या व्हायरल ऑडिओबाबत चीनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी हा ऑडिओ तैवानमधून जारी करण्यात आला असण्याची शक्यता आहे. तसेच या ऑडिओ क्लिपची पडताळणी करणे बाकी आहे आणि जगभरातील सुरक्षा एजन्सीद्वारे त्यातील संभाषणाची तपासणी केली जात आहे. ऑडिओ क्लिपमध्ये पक्षाचे सचिव, उपसचिव, गव्हर्नर आणि ग्वांगडोंग प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर यांच्यासह उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित असल्याचे समोर आले आहे. गुआंगडोंग हा चीनचा एक प्रांत आहे, ज्याचा कमांडर मेजर जनरल झोउ हे आहेत. ग्वांगडोंग प्रांतीय समितीचे स्थायी समिती सदस्य, वांग शॉक्सिन आणि ग्वांगडोंग मिलिटरी रीजनचे पॉलिटिकल ब्युरो कमिशनर यांच्यासह उच्च पदावरी पीपल्स लिबरेशन आर्मीचे अधिकारी हे या ऑडिओ क्लिपमध्ये बोलत असल्याचे समोर आले आहे.

ऑडिओ क्लिप मध्ये असे दिसून आले आहे की, कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख नेते आणि चीनच्या लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह बैठकीत, सर्वात महत्त्वाचे म्हणजे "तैवानचे स्वातंत्र्य सैन्य नष्ट करणे आणि युद्ध सुरू करण्याबाबत अजिबात संकोच न करण्याबाबत चर्चा झाली, तसेच राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता राखणे यावर चर्चा झाली. या बैठकीदरम्यान, संयुक्त नागरी-लष्करी कमांड उघडण्याची शिफारस केली गेली, जी युद्धादरम्यान तैवानमध्ये नियोजित पद्धतीने तैनात केली जाऊ शकते. सर्वोच्च गुप्त बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी चीनच्या शस्त्रास्त्र निर्मात्यांना मोठ्या प्रमाणात ड्रोन, बोटी तसेच शस्त्रे तयार करण्याची क्षमता वाढवण्यास सांगितले आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये, चिनी कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख नेते झुहाई ऑरबिटा, शेन्झेन एरोस्पेस डोंगफॉन्गहॉन्ग सॅटेलाइट कंपनी, फोशान डेलिया आणि जी हुआ प्रयोगशाळा या चार कंपन्यांनी चार उपग्रह तुकड्या तयार केल्याबद्दल चर्चा करताना ऐकू येत आहेत. "आमच्याकडे 0.5 ते 10 मीटर ग्लोबल रिमोट अल्ट्रा-हाय ऑप्टिकल रिझोल्यूशन सेन्सिंग आणि इमेजिंग क्षमता असलेले एकूण 16 लो-ऑर्बिट उपग्रह आहेत," असे अधिकारी क्लिपमध्ये बोलताना ऐकू आले. क्लिपनुसार, चीनच्या पूर्व आणि दक्षिणेकडील युद्धक्षेत्रांनी ग्वांगडोंग प्रांताला युद्धाच्या तयारीत सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे.

हल्ल्याच्या तयारीचा एक भाग म्हणून, ग्वांगडोंग प्रांताला 20 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 239 युद्धाशी संबंधित साहित्य ठेवण्यास सांगण्यात आले. त्यात 1.40 लाख लष्करी कर्मचारी, 953 जहाजे, 1653 मानवरहित उपकरणे, 20 विमानतळ जोडणारी गोदी, सहा दुरुस्ती आणि जहाज बांधणी यार्ड, 14 आपत्कालीन हस्तांतरण केंद्रे, आणि धान्य डेपो, रुग्णालये, रक्त केंद्रे, तेल डेपो, गॅस स्टेशन्स यासारख्या संसाधनांचा समावेश आहे. यासोबतच चीनच्या नॅशनल डिफेन्स मोबिलायझेशन रिक्रूटमेंट ऑफिसला नवीन सैनिकांची भरती करण्यास सांगितले आहे आणि ग्वांगडोंगला एकूण 15 हजार 500 लष्करी जवानांची भरती करण्यास सांगितले आहे.

या ऑडिओ क्लिपमधील तिसरी सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे, बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संरक्षण आयोगाच्या विधानाचा हवाला देऊन ग्वांगडोंग प्रांताला सात प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावरील युद्ध संसाधनांच्या अंमलबजावणीसाठी समन्वय साधण्यास सांगितले, ज्यामध्ये प्रामुख्याने जहाजांसाठी 6410,000 टन तेल आणि 38 विमानांचा समावेश आहे. ऑडिओ क्लिपमध्ये दावा करण्यात आला आहे की, 588 रेल्वे गाड्या आणि विमानतळ आणि गोदीसह 19 नागरी सुविधांची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. ऑडिओ क्लिप पुढे दावा करते की,अधिकाऱ्यांनी पर्ल रिव्हर डेल्टा प्रदेशाची सुरक्षा (ग्वांगझू, शेन्झेन, झुहाई, फोशान, डोंगगुआन, झोंगशान, हाँगकाँग आणि मकाऊ इ.सह) ची सुरक्षा राखण्याचा आग्रह धरला आहे, यावरून ते दाट लोकवस्तीचे प्रदेश असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT