Congo Attack 
ग्लोबल

नाताळचा दिवसच ठरला शेवटचा! स्फोटात सुसाइड बॉम्बरसह ६ जण ठार

बॉम्ब स्फोटात सहा जण ठार झाले असून १४ जण जखमी असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ डिजिटल टीम

बॉम्ब स्फोटात सहा जण ठार झाले असून १४ जण जखमी असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.

कांगोतील (Congo) बेनी (Beni) शहरामध्ये नाताळच्या (Christmas) दिवशीच मोठा हल्ला झाला. आत्मघाती हल्ल्यामध्ये हल्लेखोरासह सहा जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. एका रेस्टॉरंटबाहेर स्फोट घडवून आणण्यात आला. शहरामध्ये मुस्लिम कट्टरपंथीय असल्याचं सांगितलं जात आहे. घटनास्थळावरचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुसाइड बॉम्बरने शनिवारी गर्दीच्या ठिकाणी हा स्फोट घडवून आणला. बेनी शहरात झालेल्या या स्फोटात सुसाइड बॉम्बरसह सहा जण ठार झाल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. इनबॉक्स नावाच्या रेस्टॉरंटमध्ये गर्दीच्या वेळी हा स्फोट झाला. यानंतर गोळीबारही झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावऱण निर्माण झालं.

बॉम्ब स्फोटात सहा जण ठार झाले असून १४ जण जखमी असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. सुसाइड बॉम्बरला सुरक्षा रक्षकांनी गर्दी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये घुसण्यापासून अडवले. त्यामुळे मोठी जिवित हानी टळल्याचंही महापौरांकडून सांगण्यात आले. बेनी शहरातले इस्लामिक स्टेटचे स्लीपर सेल सक्रीय झाले असून त्यांच्याकडून हा हल्ला केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बेनी शहराच्या महापौरांनी नागरिकांना या घटनेनंतर घरी परतण्याचं आवाहन केलं. तसंच घटनेची चौकशी केली जात असल्याची माहितीसुद्धा महापौरांनी दिली. जून महिन्यातसुद्धा बेनी शहर दोनवेळा स्फोटाने हादरलं होतं. तेव्हा इस्लामिक स्टेटने याची जबाबदारी घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT