नैरोबी : पर्यावरण बदलाचा फटका बसलेल्या गरीब देशांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अल्पविकसित देशांच्या गटाकडून संयुक्त राष्ट्रांकडे करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात इजिप्तमध्ये होणाऱ्या आगामी पर्यावरण परिषदेत हा मुद्दा प्राधान्याने मांडला जावा, असं या देशांनी म्हटलं आहे. (Compensation for poor countries affected by environmental change demands to UN)
अल्पविकसित देशांच्या गटाच्या अध्यक्षा मॅडेलिन दिऊफ सार यांनी ‘असोसिएटेड प्रेस’शी बोलताना गरीब देशांची भूमिका मांडली. ‘पर्यावरण बदलाचा सर्वाधिक फटका गरीब देशांना बसत आहे. त्यामुळे या देशांच्या अडचणी आणि गरजांकडे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे. पर्यावरण बदलाचा फटका बसलेल्या देशांना निधी मिळण्यासाठी आर्थिक सुविधा निर्माण केली जावी, अशी आमची मागणी आहे. आगामी पर्यावरण परिषदेच्या अजेंड्यात या मुद्द्याला प्राधान्य दिले जावे,’ असे त्या म्हणाल्या.
अल्पविकसित देशांकडं जगाचं दुर्लक्ष
अल्पविकसित देशांच्या गटात एकूण चाळीस देशांचा समावेश आहे. पर्यावरणाची समस्या सर्व जगाला जाणवत असली तरी या देशांकडे सर्व जागतिक संस्थांचे दुर्लक्ष होत असल्याचे या गटाचे म्हणणे आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी गेल्या वीस वर्षांमध्ये या देशांमध्ये एकूण जागतिक गुंतवणुकीच्या तुलनेत केवळ दोन टक्के गुंतवणूक झाली आहे. पर्यावरण बदलाचा फटका बसणाऱ्या देशांना दर वर्षी १०० अब्ज डॉलरची मदत करण्याचे श्रीमंत देशांनी दशकभरापूर्वी मान्य केले होते. हे आश्वासन अद्यापही पूर्ण झाले नसल्याचे मॅडेलिन दिऊफ सार यांनी निदर्शनास आणून दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.