ग्लोबल

कोरोनामुळे 'या' देशात दगावली सर्वाधिक मुले; जुलैमध्ये वाढलं प्रमाण

विनायक होगाडे

जाकार्ता : कोरोना व्हायरसच्या डेल्टा या प्रकाराच्या संसर्गाने इंडोनेशियात गेल्या काही आठवड्यात शेकडो मुलांचा मृत्यू झाला आहे. यातील अनेक मुले पाच वर्षांखालील होती. कोरोनामुळे मुलांमधील हा मृत्यूदर अन्य कोणत्याही देशांपेक्षा मोठा आहे आणि मुलांना कोरोना सर्वांत कमी धोका असल्याच्या आतापर्यंतच्या निरीक्षणालाही हा धक्का आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

इंडोनेशियात चालू महिन्यातील प्रत्येक आठवड्याला शंभरपेक्षा जास्त कोरोनाबाधित मुलांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक असताना या साथीत मुलांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी तातडीने व पुरेसे उपाय योजले नसल्याची टीका येथील नेत्यांवर होत आहे. आग्नेय आशियायी देशांत ‘डेल्टा’चे भय वाढत असताना इंडोनेशियात गेल्या शुक्रवारी ( ता. २३) कोरोनाचे ५० हजार नवे रुग्ण आढळले तर एक हजार ५६६ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक लोकसंख्येचा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश असलेल्या इंडोनेशियाने या महिन्यात रोजच्या कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत व ब्राझीलला मागे टाकले आहे. या जागतिक साथीचे नवे केंद्रबिंदू हा देश ठरला आहे. आज रुग्णालयात दाखल रुग्णांच्या बचावासाठी अथक प्रयत्न सुरू होते. मृत्यूसंख्या एक हजार ३३८ नोंदविली गेली.

इंडोनेशियातील मृत्यूदराबाबत बोलताना ‘इंडोनेशियन पेडिॲट्रिक सोसायटी’ कार्यकारी संचालक डॉ. अमान भक्ती पुलुंगन म्हणाले की, ‘जगात आपल्या देशातील कोरोनारुग्णांची संख्या सर्वाधिक आहेत. आपण आपल्या मुलांना उत्कृष्ट सेवा का देऊ शकत नाही. बालरोगतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनारुग्णांच्या एकूण संख्येत १२.५ टक्के एवढे प्रमाण मुलांचे आहे. गेल्या काही महिन्यांपेक्षा यावेळी त्यात वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले. १२ जुलैच्या आठवड्यात १५० मुलांचा कोरोनाने मृत्यू झाला. पाच वर्षांखालील बालकांची संख्या यात निम्मे आहे.

लसीकरण कार्यक्रम थंडावला

कोरोनाच्‍या साथीमुळे इंडोनेशियातील मुलांच्या लसीकरण कार्यक्रम विस्कळित झाला आहे. साथीपूर्वी येथील शाळेत पोलिओ, गालगुंड, कावीळ, हिपॅटायटीस बी अशा रोगांच्या प्रतिबंधासाठी लसीकरण होत होते. पण कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणास सुरूवात झाल्याने शाळांमधील मोफत लसीकरण कार्यक्रम बंद झाला आहे, अशी खंत येथील एक ज्‍येष्ठ महिला मामिक नारिआती यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी देशांतील आठ लाख मुलांपैकी ४० टक्के मुले नियमित लसीकरणापासून दूर राहिली, अशी नोंद जागतिक आरोग्य संघटनेने आणि ‘युनिसेफ’ने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT