Omicron Corona variant sakal media
ग्लोबल

ओमिक्रॉनचा संसर्ग पंधरा देशात

मॉडर्नाकडून लस विकसित करण्याची तयारी; निर्बंधामुळे आफ्रिकी देश नाराज

सकाळ वृत्तसेवा

टोकिओ/केपटाऊन : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आढळलेला ओमिक्रॉनचा संसर्ग पंधरा देशात पसरला आहे. आज जपानमध्ये ओमिक्रॉनबाधित पहिल्या रुग्णांची नोंद झाली आहे. नामिबियाहून मंगळवारी जपानमध्ये आलेल्या ३० वर्षाच्या एका व्यक्तीत ओमिक्रॉनचे लक्षणे आढळून आले. टोकिओच्या नारिता विमानतळावर कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात ओमिक्रॉनचे विषाणू आढळून आले. दरम्यान, निर्बंधांमुळे नाराज असलेले मलावीचे अध्यक्ष लजारूस चकवेरा यांनी अमेरिका, ब्रिटनला ‘एफ्रोफोबिया’ झाल्याचा आरोप केला आहे.

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नवीन व्हेरिएंटने जगातील १५ देशांत शिरकाव केला आहे. दक्षिण आफ्रिका, बोट्स्वानासह कॅनडा, ब्रिटन, इटली, फ्रान्स, बेल्जियम, स्वित्झर्लंड, जर्मनी, डेन्मार्क, नेदरलँड, झेक रिपब्लिक, हॉंगकॉंग, ऑस्ट्रेलिया देशात ओमिक्रॉनचा रुग्ण आढळले आहेत. आता जपानमध्ये ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आला आहे. जपान सरकारचे प्रवक्ते हिरोकाजू मात्सुनो यांनी म्हटले की, नामिबियाहून आलेल्या प्रवाशाच्या नमुन्याचे विश्‍लेषण केल्यानंतर ओमिक्रॉनचे लक्षणे आढळली. हा पहिला रुग्ण आहे. त्याला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंटवर आफ्रिकी आणि पश्‍चिम देशात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आफ्रिकी देश मलावीचे अध्यक्ष लजारुस चकवेरा यांनी अमेरिका, ब्रिटन आणि युरोपिय देशांवर एफ्रोफोबिया झाल्याचा आरोप केला आहे. दक्षिण आफ्रिकेवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे चकवेरा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत शास्त्रानुसार निर्णय घेतले जात नाहीत. फेसबुक पोस्टवर ते म्हणाले, की ओमिक्रॉन व्हेरिएंट शोधल्याबद्धल जगाने आफ्रिकी संशोधकांचे आभार मानले पाहिजे. याउलट आमच्यावरच बंदी घातली जात आहे. अमेरिका, युरोप, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाकडून चुकीचे पावले उचलली जात आहेत. नव्या व्हेरिएंटवर नियमानुसार आणि शास्त्रानुसार निर्णय घ्यायला हवेत. यासाठी एफ्रोफोबिया पीडित होण्याची गरज नाही, अशा शब्दांत टीका केली आहे.

सिंगापूरमध्ये प्रवाशांची चाचणी होणार

सिंगापूर : ओमिक्रॉनमुळे सिंगापूरमध्ये निर्बंध लागू केले आहेत. दैनंदिन व्यवहारातील शिथिलता देखील कमी करण्यात आली आहे. सिंगापूरमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना आणखी कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. हे नवीन नियम लवकरच लागू होतील. तसेच १२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान सिंगापूरमध्ये दाखल झालेल्यांना तसेच ते येण्यापूर्वी चौदा दिवस अगोदर ओमिक्रॉनबाधित देशांतून आलेले किंवा गेलेल्या प्रवाशांना आरटीपीसीआर करावी लागेल.

दोन महिन्यात नवी लस

मॉडर्ना कंपनीने म्हटले की, ओमिक्रॉन व्हेरिएंटसाठी नवी लस (ओमिक्रॉन स्पेसेफिक) येत्या दोन ते तीन महिन्यांत तयार होऊ शकते. नव्या प्रकारावर सध्याच्या लशी कितपत प्रभावी ठरेल, याबाबत कोणत्याही कंपन्या ठोसपणे सांगू शकत नसल्याचे चित्र आहे. मॉडर्नाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पॉल बर्टन यांनी म्हटले की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सध्या आम्ही एवढेच सांगू शकतो की, ओमिक्रॉनसाठी नवीन लस तयार करायची असेल तर ती दोन महिन्यांत तयार करता येऊ शकते. काही आठवड्यातच नव्या व्हेरिएंटचे चित्र स्पष्ट होईल.

फ्रान्सच्या रीयुनियन द्वीपकल्पावर ओमिक्रॉन

हिंद महासागरातील रीयूनियन द्विपकल्पावर ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण असल्याची माहिती आज फ्रान्स सरकारने दिली. प्रवक्ते गॅब्रिएल अट्टल यांनी युरोप वन रेडिओ स्टेशनवर एका मुलाखतीत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याचे सांगितले. रीयूनियन द्विपकल्पाच्या साथरोग संशोधन केंद्राचे पॅट्रिक माविंगुई यांनी म्हटले की, ५३ वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉनचे लक्षणे आढळून आले आहेत. तो मोंझाबिकला गेला होता. रीयुनियनला येण्यापूर्वी तो दक्षिण आफ्रिकेत थांबला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT