maldives sakal media
ग्लोबल

मालदीवमधील कोरोना संपला; पर्यटन महोत्सवात मंत्र्यांची घोषणा

२० देशांच्या ६०० पर्यटनसंस्था सहभागी

कृष्ण जोशी

मुंबई : मालदीवमधील कोरोना (corona end in Maldives) संपल्याची घोषणा अध्यक्षांनीच केल्याने आता भारतीय पर्यटकांनी (Indian Tourist) तेथे निःशंकपणे यावे, असे आवाहन मालदीवचे पर्यटनमंत्री अब्दुल्ला मोसूम (Abdulla Mosum) यांनी येथे आयोजित पर्यटन महोत्सवात केले. हा महोत्सव दोन वर्षांनंतर होत आहे.

फेअरफेस्ट मिडियातर्फे आयोजित तीन दिवसांच्या एशिया पॅसिफिक ट्रॅव्हल शो ला आज गोरेगावच्या एनईएस संकुलात सुरुवात झाली. या प्रदर्शनात २० देशांमधील पर्यटनाशी संबंधित सुमारे सहाशे ते सातशे संस्थांनी आपले स्टॉल लावले आहेत. उद्घाटनप्रसंगी तमिळनाडूचे पर्यटनमंत्री एम. मतीवेंथन फेअरफेस्टचे अध्यक्ष संजीव अग्रवाल, अझरबैजान, नेपाळ आदी देशांचे मंत्री-अधिकारी हजर होते.

कोरोनामुळे गेली दोनवर्षे हा महोत्सव होऊ शकला नाही. त्या पार्श्वभूमीवर आज त्याला मिळालेले यश उत्साहवर्धक आहे, आता भारतातूनही आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे सुरु होत असल्याने भारतीय पर्यटकांचे परदेशांनी निःशंकपणे स्वागत करावे, असे अग्रवाल म्हणाले. या महोत्सवात कोरिया, सिंगापूर, मालदीव, सेशल्स, ग्रीस, थायलँड, श्रीलंका, फिजी, कतार, अझरबैजान, नेपाळ आदी देशांप्रमाणेच भारतातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, गोवा, लडाख, कर्नाटक, आसाम, ओरिसा, तमिळनाडू, मध्य प्रदेश आदी राज्यांचे स्टॉल होते. तेथे पर्यटनस्थळे, हॉटेल आदींचे अनेक आकर्षक चलतचित्रे तसेच छायाचित्रे होती.

यात टूर अँड ट्रॅव्हल कंपन्या, हॉटेल, पर्यटन संघटना, डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपन्या, मुंबईच्या फिल्मसिटीचे बॉलिवूडपार्क आदींनी व्यवसायवृद्धीसाठी या महोत्सवाचा फायदा करून घेतला. अनेक इच्छुक व्यक्तींनी तेथे संपर्क साधला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT