taranjit-singh-sandhu 
ग्लोबल

कोरोनामुळे जगाच्या मर्यादा उघड : संधू

पीटीआय

वॉशिंग्टन - कोरोनाच्या संकटाचा सामना करताना आंतरराष्ट्रीय यंत्रणेच्या मर्यादा उघड पडल्या असल्याने कोरोनानंतरच्या जगात न्याय, मानवता आणि समानता या मूल्यांवर आधारित यंत्रणा निर्माण होणे आवश्‍यक आहे, असे मत अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू यांनी आज व्यक्त केले. अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रिचर्ड वर्मा यांनी आयोजित केलेल्या एका चर्चा सत्रात संधू बोलत होते. 

या चर्चासत्रात संधू म्हणाले, ‘‘आर्थिक विकास आणि मानव कल्याण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधायला हव्यात. तसेच, समाजातील सर्व स्तरांमधील नागरिकांना सर्व आरोग्य सुविधा समान दर्जाच्या, परवडणाऱ्या किमतीत आणि सर्व काळ मिळणे आवश्‍यक आहे. 

सध्याच्या कोरोनाच्या संकटाने सर्व जगातील यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे यानंतरच्या काळात मानवता आणि समानतेच्या आधारावरच जागतिकीकरण होणे अत्यंत आवश्‍यक आहे.’’ जेनिरिक औषधांच्या निर्मितीमध्ये सर्वात मोठा निर्यातदार असलेला भारत कोरोनाची लस विकसीत करण्यासाठी अमेरिकेबरोबर काम करत असून या लसीबरोबरच सर्व प्रकारची औषधे परवडणाऱ्या किमतीत विकसीत करण्यासाठी भारत कायम प्रयत्नशील असतो, असेही संधू यांनी यावेळी सांगितले. हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनी अमेरिकेतील विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठ आणि फ्लूजेन या कंपनीच्या सहकार्याने कोरोनावरील ‘कोरोफ्लू’ ही लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

पाणी मागणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला ‘मुले चोरणारी’ समजून मारहाण, नागपूरमधील धक्कादायक प्रकार...

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Latest Marathi Live Update: सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT