Corona Vaccine Booster Dose
Corona Vaccine Booster Dose Sakal
ग्लोबल

चौथ्या बूस्टर डोसची गरज, व्हाईट हाऊसच्या वैद्यकीय सल्लागाराचे संकेत

सकाळ डिजिटल टीम

संयुक्त राष्ट्रामध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ओमिक्रॉनशी लढण्यासाठी कोरोना लशीच्या चौथ्या बूस्टर डोसची (Corona Vaccine Booster Dose) गरज पडू शकते. तसे संकेत व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार (CMA) अँटोनी फौसी यांनी दिले आहेत.

एम-आरएनए प्रकारातील लशी घेतलेल्या नागरिकांना आणखी बूस्टर डोस घेण्याची गरज आहे. पण, त्यांचं वय, रोगप्रतिकार शक्ती यावर बूस्टर डोस घ्यायचा की नाही हे अवलंबून असेल, असंही फौसी म्हणाले. त्यांच्याकडे याबाबत डेटा देखील उपलब्ध आहे. ते बुधवारी पत्रकारांशी बोलत होते.

ओमिक्रॉन नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा आढळून आला. त्यानंतर जगभरात पसरला आणि काही लोकांचे मृत्यू देखील आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. वॉशिंग्टन पोस्टनुसार, जगभरात सलग पाचव्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू वाढले आहेत, गेल्या आठवड्यात नोंदवले गेलेले 68,000 मृत्यू मागील आठवड्याच्या तुलनेत 7 टक्क्यांनी वाढले आहेत.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन हा काही कोरोनाचा शेवटचा व्हेरियंट नाही. कोरोनाचे आणखी नवे व्हेरियंट येण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉन ज्याप्रकारे पसरतो आहे त्यातून आणखी जास्त व्हेरियंट तयार होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील व्हेरियंट हे ओमिक्रॉनपेक्षा धोकादायक असू शकतात, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT