corona virus. 
ग्लोबल

कोरोना पोहोचला सर्वत्र; सातव्या खंडावरही विषाणूचा प्रवेश

सकाळन्यूजनेटवर्क

सँटिॲगो- संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या विषाणूने अंटार्क्टिका खंडातही आता प्रवेश केला आहे. आतापर्यंत कोरोनाच्या प्रभावापासून मुक्त असलेल्या या खंडामध्ये चिली देशाच्या लष्करी तळावरील 36 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे.

कोरोना विषाणूने आता जगातील प्रत्येक खंडावर आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. चिलीच्या तळावरील 26 सैन्य अधिकाऱ्यांना आणि 10 कंत्राटदारांना संसर्ग झाल्याने त्यांना संशोधन केंद्रापासून वेगळे ठेवताना इतर अधिकाऱ्यांची दमछाक होते आहे. येथे चिलीचे संशोधन केंद्र असून त्याचे कार्यसंचालन सैन्यदलांमार्फत चालते. हे केंद्र अंटार्क्टिका खंडाच्या उत्तर टोकाला आहे. ही जागा जगातील सर्वांत दुर्गम जागांपैकी एक आहे.

डुकरांच्या मांसाचा अंश असलेली लस मुस्लिमांनी घ्यावी, जीव महत्त्वाचा; इस्लामिक...

संसर्गाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी येथील अधिकाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी पर्यटनाला बंदी घातली, दैनंदिन कामकाज अधिक आखीव केले आणि बाहेरच्यांना प्रवेशही नाकारला. या संपूर्णपणे हिमाच्छादित खंडावर 38 संशोधन केंद्र असून जवळपास एक हजार लोकांचे वास्तव्य आहे. इतके महिने कोरोनाला दूर ठेवले असले तरी गेल्या काही दिवसांपासून अनेकांचे येणे-जाणे वाढल्याने संसर्गाचा धोका वाढला होता.

चिलीचे दोन सैनिक डिसेंबरच्या 15 तारखेच्या आसपास आजारी पडले होते. त्यानंतर संसर्ग पसरला. 27 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या काळात चिलीच्या नौदलाचे एक जहाज येथे आले होते. त्यातील तीन जणांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC: एसटीला दिलासा! दरवर्षी २४१ कोटींची बचत होणार, उत्पन्न वाढीसाठी परिवहनमंत्र्यांचा मोठा निर्णय

Pune समलैंगिक संबंधांना विरोध, २१ महिन्यात २ अल्पवयीनांची हत्या; २२ वर्षीय तरुणाला अटक

"प्लीज मला माझ्या लग्नाला बोलवा" व्हायरल खोट्या बातमीवर भाऊ कदमच्या लेकीची मजेशीर कानउघाडणी

Mumbai News: धारावी स्कायवॉकसाठी म्हाडाला फोडणी, पालिकेला ७५ लाख द्यावे लागणार; कारण काय?

Summer Office Wear Secret! फक्त ‘या’ टिप्सने मिळवा कूल आणि स्टायलिश प्रोफेशनल लुक

SCROLL FOR NEXT