Corona Virus
Corona Virus 
ग्लोबल

'कोरोनाव्हायरस'चा प्रभाव वाढला; 41 जणांचा मृत्यू, तर 237 जण गंभीर 

पीटीआय

बीजिंग - कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे चीनमधील मृतांची संख्या 41 वर पोहोचली असून, या विषाणूची लागण झालेल्यांचा आकडा 1 हजार 287 वर पोहोचला आहे. तसेच या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 237 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शनिवारी सांगितले. 

मृतांमधील 39 जण हे एकट्या हुबेई प्रांतातील असून एक जण ईशान्य प्रांतातील हेलॉन्जियांग येथील असल्याची माहिती आयोगाने दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून, त्यावर अद्याप कुठलाही उपचार सापडलेला नाही. त्यातच कोरोनाव्हायरसची लागण झालेल्यांचा आकडा 1300 वर पोहोचला असून आणखी एक हजार 965 संशयीतांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची शक्‍यता असल्याचेही आयोगाने सांगितले. 

चीनने या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच या रोगाच्या रुग्णांच्या उपचारासाठी 1 हजार खाटांचे रुग्णालय केवळ 10 दिवसांत बांधण्याचा निर्णय घेतला असून वुहान आणि हुबेई प्रांतातील इतर बारा शहरांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास आणि त्याच्या संशयीतांना उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सैन्य चिकित्सक तैनात करण्यास सुरवात केली असल्याचेही आयोगाने सांगितले. 

दरम्यान चीनने देशभरातील सार्वजनीक वाहतूकीच्या ठिकाणी या रोगाची लक्षण असलेला संशयीत रुग्ण अढळल्यास त्याला तात्काळ रुग्नालयात दाखल करण्याच्या सूचन दिल्या असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

या विषाणूचे संशयीत रुग्ण हॉंगकॉंग, मकाऊ, तैवान, नेपाळ, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, थायलंड, व्हिएतनाम आणि अमेरिकेत अढळले असून अमेरिकेत दोन जणांना याची लागण झाली असून, फ्रान्समध्येही दोन संशयीत रुग्ण अढळले आहेत. तर शुक्रवारी जपानने एकाला या विषाणूची लागण झाल्याची पुष्टी केली आहे. या रोगाचे चार संशयीत रुग्ण ऑस्ट्रेलियातही अढळल्याचे येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. यातील तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. 

भारतात आकरा संशयीत रुग्ण 
गेल्या काही दिवसांत चीनचा दौराकरून परतलेल्या आकरा जणांमध्ये कोरोना या विषाणूची लक्षणे अढळली असून त्यांच्यावर रुग्णालयातील विशेष विभागात उपचार सुरू असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. यामधील सात जण केरलचे, दोन जण मुंबईचे एक बंगळुरू आणि एक जण हैदराबादचा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान मुंबई येथील दोन्ही आणि बंगळुरू आणि हैदराबाद येथील रुग्णांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे समोर आले आहे. तसेच केरळमधील 73 जणांना कोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरून त्यांच्यावर वैद्यकीय पाळत ठेवली जात असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांशी कोरोना विषाणूशी संबंधित मुद्द्यांवर तसेच भारतातील प्रतिबंधात्मक व्यवस्थापनावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT