britain 
ग्लोबल

ब्रिटनमध्ये आढळले आजवरचे सर्वाधिक कोरोनाबाधित; नव्या स्ट्रेनचा कहर

सकाळवृत्तसेवा

लंडन : गेल्या एका वर्षापासून जगभरात कोरोना नावाच्या विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोना नावाचा व्हायरस पसरल्यापासून आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संक्रमणाची नोंद झाली आहे. एका दिवसात सर्वाधिक म्हणजे 60,196 नवे रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये सापडल्यानंतर तिथे अत्यंत गतीने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 30 टक्क्यांनी अधिक रुग्णांची भर या आठवड्यात झाली आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती आणखीन बिघडून हाताबाहेर जाऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी काल मंगळवारी म्हटलं की, देशात लशीकरणाशी निगडीत दररोजची आकडेवारी जाहीर केली जाईल.

गेल्या काही दिवसांपूर्वीच कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आढळून आला होता. हा स्ट्रेन नेहमीच्या कोरोना व्हायरसपेक्षा अधिक गतीने पसरतो. तो अधिक संसर्गजन्य आहे. हा स्ट्रेन आता इतर जगभरात देखील वेगाने पसरत आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा केली आहे. जॉनसन यांनी माहिती दिलीय की, आतापर्यंत ब्रिटनमध्ये 13 लाख लोकांना फायझर/बायोनटेक तसेच ऑक्सफर्ड/एस्ट्राजेनेकाची लस दिली गेली आहे. 

लॉकडाऊनच्या दरम्यान या लशीकरण मोहिमेस आणखी गती आणली जाईल. त्यांनी म्हटलंय की, यामुळे सर्वाधिक संवेदनशील समूहामध्ये प्रत्येकी चार व्यक्तीमधील एका व्यक्तीमध्ये दोन ते तीन आठवड्यांच्या दरम्यानच कोरोनाशी लढण्याची चांगली प्रतिकार शक्ती निर्माण होईल. तसेच त्यांनी पुन्हा एकदा आशा वर्तवली की येत्या काही आठवड्यांतच परिस्थिती चांगली होईल. याबाबतचा निर्णय जाहीर करताना ते म्हणाले की, येणारे काही आठवडे आतापर्यंतचे कठीण आठवडे असतील मात्र माझा विश्वास आहे की आपण या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China-Pakistan Relation: सेकेंड स्ट्राइक क्षमतेच्या शोधात पाकिस्तान? चीनकडे अणु पाणबुड्यांची मागणी; मोठी रणनीती उघड

Mumbai Ahmedabad Highway Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक; ३-४ ठार, २५ हून अधिक जखमी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारवर दबाव वाढला! वेतन आयोगासमोर कर्मचाऱ्यांच्या ‘या’ मोठ्या मागण्या

नवरा कोट्यवधींचा मालक तरीही लोकप्रिय अभिनेत्रीवर आली शेण उचलायची वेळ? व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा, इंधनाअभावी अनेक पेट्रोल पंप बंद

SCROLL FOR NEXT