corona virus new strain south africa 
ग्लोबल

दक्षिण आफ्रिकेतही कोरोनाचा नवा प्रकार; ब्रिटनमधील विषाणूपेक्षा वेगळा

सकाळ डिजिटल टीम

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे संसर्ग अधिक प्रमाणात फैलावत असल्याचा दावा येथील सरकारने केला आहे. ‘501. व्ही 2’ असे या विषाणूच्या नव्या प्रकाराचे नाव असून दक्षिण आफ्रिकेत नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये तो आढळून येत असल्याचे येथील डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. प्राथमिक माहितीनुसार, संसर्गाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक वेगाने पसरत असून ती अधिक प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. विषाणूच्या नव्या प्रकाराचा हा परिणाम आहे, असे सरकारच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष प्रा. सलीम अब्दुल करीम यांनी पत्रकारांना सांगितले.

दुसऱ्या लाटेत अधिक प्रमाणात रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. देशात सध्या साडे आठ हजार जणांवर उपचार सुरु आहेत. देशात दुसऱ्या लाटेची ही सुरुवात असली आणि नव्या विषाणूच्या प्रभावाची माहिती प्राथमिक निष्कर्षावर अवलंबून असली तरी आतापासूनच उपाययोजना करण्याची आवश्‍यकता असल्याचे प्रा. करीम यांनी सांगितले.

ब्रिटनमधील विषाणूपेक्षा वेगळा
दक्षिण आफ्रिकेतील हा नवा विषाणू प्रकार ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या प्रकारापेक्षा वेगळा आहे. दक्षिण आफ्रिकेतील हा प्रकारही कोरोनाच्या मूळ विषाणूपेक्षा अधिक घातक असून विकसीत झालेल्या लशी यावरही परिणामकारक आहेत का, याचा अभ्यास केला जात आहे.

पुन्हा निर्बंध
संसर्ग वाढीमुळे दक्षिण आफ्रिकेत नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशातील समुद्र किनारे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले असून व्यापारासाठी दिवस आणि वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये या देशात सरासरी नव्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Matoshree : मातोश्रीजवळ ड्रोनच्या घिरट्या, उद्धव ठाकरेंवर नजर ठेवली जातेय? मुंबई पोलिसांनी सांगितले खरं कारण

Kolhapur Crime : दोन चाकीच्या डिकीत पैसे ठेवून मोबाईलवर बोलत होता, एक मिनीटातचं चोराने १ लाख रुपये चोरलं, सीसीटीव्ही फुटेज समोर

Latest Marathi Breaking News Live: मनोरमध्ये उड्डाणपुलाचा भाग कोसळला; मोठी दुर्घटना टळली

Pune Abu Dhabi Flight: पुण्याहून अबुधाबीसाठी पुन्हा विमानसेवा

Nashik Kumbh Mela : २०२७ चा कुंभमेळा महाराष्ट्राचे 'ब्रँडिंग'! मुख्य सचिव राजेशकुमार यांचे सूक्ष्म नियोजन आणि विकासकामांना गती देण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT