coronavirus crisis, coronavirus, WHO 
ग्लोबल

लॉकडाउन हटवण्यासंदर्भात WHO कडून भारताला खास सल्ला

सकाळ डिजिटल टीम

जिनेव्हा : कोरोना विषाणूमुळे देशात निर्माण झालेली परिस्थितीत सुधारणा होतानाचे चित्र दिसत नाही. दिवसागणिक देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतरही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ देश लॉकडाउन आहे. वेगवेगळ्या भागात शिथिलता देत लॉकडाउन हटवण्याच्या दिशेने हालचाली सुरु आहेत. याबाबत जागितक आरोग्य संघटनेनं भारताला इशारा दिलाय. लॉकडाउन हटवल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळतील, अशी भिती जागतिक आरोग्य संघटनेतील एका प्रमुख अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

सध्याच्या घडीला भारतामध्ये कोरोनाजन्य परिस्थितीती चिंताजनक नाही. पण लॉकडाउन हटवल्याचा देशाला मोठा फटका सहन करावा लागू शकतो. कोरोनाग्रस्तांची सख्या अधिक वाढू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेतील प्रमुख अधिकाऱ्याने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपतकालीन कार्यक्रमाचे प्रमुख मिशेल रियान म्हणाले की, भारतामध्ये सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा दुप्पट होण्याचा कालावधी हा तीन आठवड्यांचा आहे. शहर आणि ग्रामीण भागात खूप अंतर आहे.

भारतासह बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये ही कोरोनाजन्य परिस्थितीने धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. पण पुढील काही दिवसांत हा आकडा अचानक वाढू शकतो. या वक्तव्यातून त्यांनी लॉकडाउनसंदर्भात निर्णय घेताना काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज असल्याचेच संकेत दिले आहेत.    भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एका दिवसात 9,887 नवे रुग्ण आढळले होते. तर 294 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या नव्या आकडेवारीसह देशात आतापर्यंत 2,36,657 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 6,642 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT