coronavirus lockdown man breaks into restaurant drank 70 bottle of alcohol in 4 days 
ग्लोबल

तळीरामाने बंद हॉटेलमध्ये केला 'असा' प्रताप...

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे तळीरामांचे हाल होऊ लागले. तळीराम दारूसाठी काहीही करत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. मात्र, येथील एका तळीरामाने बंद हॉटेलमध्ये घुसून चार दिवसांत 70 बाटल्या संपवल्या पण अखेर सापडलाच.

तळीराम काही ठिकाणी दारूची दुकाने फोडत आहेत तर काही ठिकाणी यू-ट्यूबवर पाहून दारू बनवत आहेत. दारू मिळविण्यासाठी अक्षरशः काहीही करताना दिसत आहेत. अमेरिकेतील न्यू हेव्हन येथेही असाच एक प्रकार घडला आहे. लुइस एजेंल याला दारूचे व्यसन होते. लॉकडाऊनमुळे त्याचे हाल होत होते. शेवटी तो एका बंद हॉटेलमध्ये पाठीमागून घुसला. हॉटेलमध्ये बसून त्याने चार दिवसांत 70 बाटल्या फस्त केल्या. रात्रं-दिवस फक्त दारूच पित होता. सुरक्षारक्षकांना आवाज आल्यामुळे त्यांनी आत प्रवेश केल्यानंतर लुइस आढळून आला. सुरक्षारक्षकांनी पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात दिला.

दरम्यान, हॉटेलच्या मालकाने तक्रार दिली असून, पोलिसांनी लुइसला ताब्यात घेतले आहे. शिवाय, नुकसानभरपाई देण्यास सांगितले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident:'टेंभुर्णी-पंढरपूर रोडवरील अपघातात २ मजुरांचा मृत्यू'; अज्ञात वाहनाची धडक, हातावर पोट अन्..

Latest Marathi News Live Update : माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांचं निधन

Pune Weather Update: पुण्यात पुन्हा सरींचा हल्ला! पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी

Pandharpur Kartiki Yatra: पंढरपूर कार्तिकी यात्रेसाठी ११५० जादा बस; वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज; उद्यापासून ६ नोव्हेंबरपर्यंत सेवा

Solapur Municipal Corporation: बिल्डरांच्या बेकायदा बांधकामावर कारवाई करा; आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जनता दरबारात दाद

SCROLL FOR NEXT