coronavirus strain In south africa  
ग्लोबल

Coronavirus New Strain : आफ्रिकेत आढळला ब्रिटनपेक्षा आणखी वेगळा कोरोना व्हायरस

सकाळ ऑनलाईन टीम

New coronavirus strain In south africa; जोहन्सबर्ग: 2020 वर्षाच्या अखेरीस कोरोना व्हायरसच्या (coronavirus) च्या संकटातून बाहेर पडण्याच्या सकारात्मक बातम्या येत असताना ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या आणि वेगळ्या कोरोना विषाणूनं डोकेवर काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. ब्रिटनमधील या नव्या कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी तेथील सरकारने पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. नव्या कोरोना विषाणूचा (Coronavirus New Strain)   शिरकाव रोखण्यासाठी भारतानेही कठोर पावले उचलली असून ब्रिटनची विमान सेवा स्थगित केली आहे. 

त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेतही नव्या कोरोना विषाणू  New (COVID19 Strain) आढळल्याचे वृत्त समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाग्रस्तांची आणि मृतांचा आकडा अचानक वाढला आहे. कोरोनाचा प्रादुर्भावाचा वेगही वाढला आहे. ब्रिटनपेक्षा वेगळ्या प्रकारचा कोरोना विषाणू आढळल्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील आकडा वेगाने वाढत असल्याचा दावा करण्यात येत आहे. कोविड 19 च्या प्रतिबंधासाठी उपयुक्त होणारी लस  नव्या विषाणूच्या प्रकारावर उपयुक्त ठरु शकते का? याचा अभ्यासही दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ज्ञांनी सुरु केलाय.  ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी आणि एस्ट्राजेनेका द्वारा विकसित केलेल्या लशीसहीत अन्य काही लशीचे दक्षिण आफ्रिकेत क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. 

दक्षिण आफ्रिकेतील आरोग्य विभागाचे अधिकारी आणि विषाणूसंदर्भात रणनिती आखणाऱ्या शास्त्रज्ज्ञांनी, 501.V2 च्या रुपात नव्या  विषाणूची ओळख केली आहे. नव्या विषाणूमुळेच दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे.   सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिकेत 8500 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.ऑगस्टमध्ये रुग्णालयात भर्ती होणाऱ्या रुग्णालाचा आकडा हा 8,300 होता. याठिकाणी आतापर्यंत 912, 477 रुग्ण आढळले असून  24,539 जणांचा मृत्यू झाला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT