Aircraft Aircraft
ग्लोबल

आफ्रिकेहून विमान नेदरलँडमध्ये; प्रवाशांना ओमिक्रॉन झाल्याची भीती

सकाळ डिजिटल टीम

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा (Coronavirus) नवीन विषाणू ओमिक्रॉन (Omicron Variant) आढळून आला आहे. सोबतच तीन ते चार देशात याचे रुग्ण आढळल्यानंतर सरकार आवश्यक ती काळजी घेत आहे. आफ्रिकेत (South Africa) जाण्यात आणि तेथील विमानांना दुसऱ्या देशात येण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही दक्षिण आफ्रिकेतून दोन विमान नेदरलँडच्या (Netherlands) ॲमस्टरडॅमला उतरले. यामुळे ८५ जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आफ्रिकेतील फ्लाइट्सवरील सर्व लोकांची तपासणी केली जात असली तरी, सुमारे ६०० प्रवासी असलेले केएलएमचे दोन विमान ॲमस्टरडॅमच्या शिफोल विमानतळावर उतरले. नेदरलँड आरोग्य अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार यातील ८६ लोकांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. नेदरलँड्समध्ये येणाऱ्या प्रवाशांना चाचण्या आणि अलगावला सामोरे जावे लागेल, असे आरोग्य मंत्री ह्यूगो डी जोंग यांनी सांगितले.

आफ्रिकेतून येणाऱ्या विमानातील सर्व प्रवाशांची तपासणी केली जात आहे. केनेमरलँडच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, डच शैक्षणिक वैद्यकीय रुग्णालयाद्वारे पॉझिटिव्ह प्रकरणाचे विश्लेषण केले जात आहे. मोठ्या संख्येने प्रवासी ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळल्यास चिंता निर्माण होईल. डचच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, डच सरकारने शुक्रवारी रात्री बार, रेस्टॉरंट्स आणि बहुतेक दुकाने बंद ठेवण्याची घोषणा केली. देशाल कोविड-१९ च्या महामारीचा सामना करीत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आकाश अंबानीने विचारलं, पुन्हा Mumbai Indians चा कॅप्टन होशील का? रोहित शर्मा सुरुवातीला अनिच्छुक होता, पण...; Hardik Pandya ला हटवण्याचा प्लॅन आधीच ठरलेला?

घरात मीटर नाही, तरी पाठवलं २३०६ रुपयांचं वीज बिल; महावितरणच्या कारभाराचा 'उजेड', नागरिकांकडून नाराजी

Megablock: लोकल वाहतुकीला उद्या ब्रेक! मध्य, ट्रान्सहार्बरवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन कामे, पाहा वेळापत्रक

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या भेटीला गौतम अदानी; रुग्णालयात जाऊन घेतली प्रकृतीची विचारपूस

Wild Edible Plants: लुप्तप्राय जंगली खाद्यवनस्पतींवर संशोधन ,प्रा. गिरीश भातडे , पारंपारीक माहितीला विज्ञानाची जोड

SCROLL FOR NEXT