coronavirus patient funeral in different countries 
ग्लोबल

प्रत्येक देशात वेगळी पद्धत; कोणत्या देशात कसे होतात कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार

अशोक गव्हाणे

नवी दिल्ली : कोरोनाग्रस्तांवरील मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना वेग-वेगळ्या देशांमध्ये वेग-वेगळे नियम आहेत. अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना मृत शरीराला स्पर्श करण्याची परवानगी नाही. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला जाळलं किंवा दफनही केलं जाऊ शकतं असल्याचं सांगितलं आहे.

मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांमध्ये मृतदेहाला अग्नि देण्याऐवजी दफन करण्याची प्रथा आहे. परंतु काही देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मृतदेह जाळण्याचे आदेश दिले आहेत. यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मृत्यूंमुळे काही देशांमध्ये मृतदेह दफन करण्यासाठी जागेची कमतरता आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे, मृतदेह दफन करण्याच्या तुलनेत मृतदेह जाळल्याने व्हायरस नष्ट होण्याची शक्यता अधिक आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉकडाऊनमध्येही जिओची भरभराट; फेसबुक, सिल्वर लेक नंतर 'या' तिसऱ्या कंपनीची गुंतवणूक

चीनमध्ये कोरोनामुळे बळी गेलेल्यांचे मृतदेह जाळण्यात येत आहेत. चीनप्रमाणे श्रीलंकेतही मृतदेह जाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमेरिकेत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, लोक आपल्या धर्म आणि प्रथेनुसार मृतावर अंत्यसंस्कार करु शकतात. परंतु यात १० हून अधिक लोक सामिल होऊ शकत नाही. त्याशिवाय मृतदेहाला कुटुंबियांनी स्पर्श करु नये, असंही सांगण्यात आलं आहे.

धक्कादायक ! बीएसएफच्या २ जवानांचा कोरोनाने मृत्यू

इटलीमध्ये नियम कठोर आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला रुग्णालयातील कपड्यांवरच दफन केलं जातं. नातेवाईंकाना मृतदेह पाहण्याचीही परवानगी नाही. इस्त्राईलमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना त्याचा चेहरा पाहण्याची परवानगी आहे. परंतु यावेळी त्यांना पीपीई किट घालणं अनिर्वाय आहे. ब्रिटनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मृताच्या नातेवाईकांना अंतिम संस्कार करण्याची परवानगी आहे.

भारतात असे होतात अंत्यसंस्कार
भारतात प्रथेनुसार, मृतदेहाला अग्नी देण्याची किंवा दफन करण्याची परवानगी आहे. परंतु, मृतदेहावर कोणत्याही प्रथा करु शकत नाही. भारत सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोनाबाधित मृतदेह ट्रेंड हेल्थकेयर वर्करच घेऊन जाऊ शकतात. हेल्थ केयर वर्कर आणि मृताच्या कुटुंबियांना पीपीई किट घालणे अनिवार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईकरांवर जलसंकटाचे सावट! पाणीकपातीत वाढ होणार, पालिकेचा मोठा निर्णय; कधीपासून आणि का?

Video: बापरे! बनावट दुधाचा तलाव बघितला का? शेकडो टँकर्स केले रिकामे; व्हिडीओ नेमका कुठला?

लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेची वेळ बदलली, 'या' वेळेस प्रेक्षकांच्या भेटीला, कोण घेणार निरोप?

Latest Marathi News Live Update : ऑगस्ट २०२७पर्यंत पिण्याचं पाणी सुरक्षित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Cabinet Meeting : नागपूरमधील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रकल्पाला मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ६ मोठे निर्णय, वाचा...

SCROLL FOR NEXT