coronavirus prank video metro moscow russia 
ग्लोबल

मेट्रोत कोरोना-कोरोना म्हणून ओरडला अन्...

वृत्तसंस्था

मॉस्को (रशिया): मेट्रोत प्रवेश केल्यानंतर कोरोना-कोरोना ओरडत खाली पडला. प्रवासी घाबरून बाहरे पडले. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, युवकाला कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

चीनमध्ये कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून, अनेकांना या रोगाची भिती आहे. या रोगाची भिती दाखवून चेष्टा करणे महागात पडले आहे. युवकाला 5 वर्षांचा कारावास आणि 5.5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

संबंधित व्हिडिओमध्ये एक युवक मास्क लावून मेट्रोत येतो आणि लोकांच्या समोर पडतो. त्यानंतर दुसरा एक तरुण तिथे येऊन मोठमोठ्याने कोरोना-कोरोना ओरडत धावू लागतो. यामुळे मेट्रोतील इतर प्रवासी घाबरतात आणि जीव वाचवण्यासाठी पळू लागतात. पोलिसांनी हा प्रँक व्हिडिओ बनवणाऱ्या प्रँकस्टारला अटक केली आहे. शिवाय त्याच्या इतर 2 साथीरांचाही शोध सुरू आहे.

प्रँक बनवणाऱ्या तरुणाच्या वकिलाने सांगितल की, 'या तरुणाविरोधात पोलिसांनी वॉरंट जारी केल्यानंतर युवक स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला आहे. एका छोट्याशा चेष्टेमुळे प्रवाशांना त्रास होईल याचा विचारही त्याने केला नव्हता. त्याला फक्त नागरिकांना सावध करायचे होते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Water Crisis : 1972 नंतरचा सर्वांत तीव्र दुष्काळ! 'कोयनेचे पाणी अडवाल तर गाठ माझ्याशी...'; कोरड्या पडलेल्या कृष्णेच्या पात्रातून आमदार विश्वजीत कदमांचा थेट इशारा

हॉटेलमध्ये गोळीबार करत ५ जणांची हत्या, हॉटेल मालकिणीसह एकाच कुटुंबातल्या चौघांना संपवलं

'पाटलांचा बैलगाडा...' गौतमी पाटीलचा 'कोण होणार करोडपती'च्या हॉटसिटवर धमाकेदार डान्स, Video Viral

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; काही काळ प्रक्रिया थांबवली, मतमोजणीवर 'मविआ'च्या उमेदवारांचा आक्षेप

Hapus Mango Rate : 1 डझन आंबा तब्बल 2500 रुपयांना! कोल्हापूरच्या बाजारात तमिळनाडूतून 'हापूस'च्या 40 पेट्या दाखल, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

SCROLL FOR NEXT