tirumurti esakal
ग्लोबल

सर्व देशांनी संयम बाळगावा : तिरुमूर्ती

भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्‍य असल्याची ‘यूएन’मध्ये ग्वाही

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क: रशियाने युक्रेनमधील डोनेत्स्क आणि लुहान्क पीपल्स रिपब्लिक या प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिल्यानंतर रशिया- युक्रेन सीमेवरील तणावात भर पडली आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताने तीव्र चिंता व्यक्त करीत सर्व देशांना संयम बाळगण्याचे आवाहन ‘यूएनएससी’तील भारताचे स्थायी सदस्य टी. एस. तिरुमूर्ती यांनी केले. तसेच युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाय करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

युक्रेनचे तुकडे करून दोन नव्या स्वतंत्र देशांना मान्यता देणाऱ्या अधिकृत कागदपत्रांवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल स्वाक्षरी केली. यामुळे या प्रदेशातील तणावात भर पडली असून रशिया युक्रेनवर आक्रमण करण्याची भीती गडद झाली आहे. रशियाच्या कृतीनंतर ‘यूएनएससी’ आपत्कालीन बैठक सोमवारी (ता.२१) रात्री बोलविण्यात आली. या समितीचे अध्यक्षपद एक महिन्यासाठी रशियाकडे आहे. बैठकीत तिरुमूर्ती यांनी भारताची भूमिका मांडली. युक्रेनसंबंधीत घडामोडींवर तसेच युक्रेनच्या पूर्व सीमेवरील हालचाली आणि रशियाने केलेल्या घोषणेवर भारताचे लक्ष आहे. सर्व देशांना संयम राखण्याचे आवाहन करीत तणाव कमी करण्यास प्राधान्य द्यायला हवे. हा प्रश्‍न राजनैतिक पातळीवरील चर्चेतूनच सुटेल असा विश्‍वास भारताला आहे, असे ते म्हणाले.

तिरूमूर्ती यांनी मांडलेली भारताची भूमिका.हा प्रश्‍न राजनैतिक चर्चेतूनच सुटेलतणाव कमी करणाऱ्यांच्या प्रयत्नांना आपण पाठिंबा द्यायला हवा ‘ट्रायलॅटरल कॉन्टॅक्ट ग्रुप’च्या माध्यमातूनहोणाऱ्या प्रयत्नांचे स्वागत आहेलष्करात वाढ होणे हे आपल्याला परवडणारे नाही

भिन्न विचारांमधील अंतर कमी करण्यावर अधिक भर हवायुक्रेनच्या वादावर चर्चेने मार्ग काढावा, अशी भारताची इच्छा आहे. अमेरिका व रशियामध्ये चर्चा झाली तर यावर नक्कीच उपाय निघेल. भारताला शांतता हवी आहे.

-राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांनी घाबरून जाऊ नये. भारत सरकारने नियमावली जाहीर केली आहे. भारतीय नागरिक आपल्या दूतावासाच्या संपर्कात आहेत.

मीनाक्षी लेखी, परराष्ट्र राज्य मंत्री

रशियाबरोबरील संबंध तोडण्याचा विचार युक्रेन करीत आहे. रशिया व जर्मनी या देशांदरम्यान सुरू होणाऱ्या नॉर्ड स्ट्रीम २ पाइपलाइनवर अमेरिका व पश्‍चिमी देशांनी प्रतिबंध लावावा.

व्होल्व्होडिमायर झेलेन्स्की, अध्यक्ष, युक्रेन

युक्रेनमधील डोनत्स्क आणि लुहान्क यांना स्वतंत्र ओळख देण्याच्या रशियाच्या निर्णयाने खूप काळजी वाटत आहे. हा निर्णय म्हणजे युक्रेनची प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन असून संयुक्त राष्ट्रांच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. ‘मिन्स’ करारानुसार पूर्व युक्रेनमधील वादावर शांततेने तोडगा काढायला हवा.

-अँटोनिओ गुटेरेस, सरचिटणीस, यूएन

आमच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची परीक्षा पुतीन घेत आहेत. आपल्या निग्रहाची परीक्षा ते घेत आहेत. ते आपल्या सर्वांना किती पुढे ओढू पाहतात, हे पाहावे लागेल. सैन्याच्या बळावर यूएनची टर उडवू शकतो, असे त्यांना वाटत आहे. रशियन फौजांना हे शांततादूत म्हणतात. हा मूर्खपणा आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी आपण एकत्रितपणे कृती केली पाहिजे.

-लिंडा थॉमस- ग्रीनफिल्ड, ‘यूएन’मधील अमेरिकेच्या राजदूत

राजनैतिक तोडग्यासाठी आम्ही राजनैतिक मार्ग खुले ठेवले आहेत. कीवला त्यांच्या बांधिलकीचे स्मरण करून देण्याऐवजी ‘मिन्स्क’ करारानुसारच्या नियमांचा भंग रशियाने केल्याचा बाष्कळ मंत्र जपत अमेरिकेने युक्रेनला भरीस पाडले आहे.’’

वास्सिली नेबेन्झिया, ‘यूएन’मधील रशियाचे राजदूत

‘रशियाने निर्णय मागे घ्यावा’

स्वतंत्र ओळख देण्याचा निर्णय रशियाने मागे घ्यावा आणि चर्चेस तयार व्हावे. युक्रेनच्या प्रदेशात रशियाचे अतिरिक्त फौजा तैनात करण्याच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. या फौजा तातडीने पूर्णपणे माघारी घ्यावात, अशी मागणी आम्ही करीत आहोत, असे युक्रेनने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT