कोरोना
कोरोना 
ग्लोबल

कोरोना विषाणूची निर्मिती चीनमध्येच - संशोधकांचा दावा

नामदेव कुंभार

दीड वर्षांपासून कोरोना महामारीनं जगभरात थैमान घातलं आहे. या महामारीनं लाखोंचा बळीही घेतला. 2019 मध्ये चिनच्या वुहान येथून संसर्ग झालेला हा विषाणूनंतर जगभरात पसरला. हा जिवघेणा विषाणू नैसर्गिक आहे की मानवनिर्मित? याचा शोध घेण्यासाठी जगभरातील संशोधकांनी दिवसरात्र एक केली. चीनने हा विषाणू नैसर्गिक असल्याचं सांगितलं आहे, मात्र नुकत्याच हाती आलेल्या एका रिसर्चनुसार हा चीनमध्ये तयार झालेला विषाणू आहे. कोरोना विषाणू चीनने जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून तयार केल्याचा दावा नुकत्याच एका अभ्यास अहवालात करण्यात आला आहे. ‘सायन्स जर्नल क्वार्टरली रिव्ह्य़ू बायोफिजिक्स डिस्कव्हरी’ या नियतकालिकात हा २२ पानांचा रिसर्च पेपर प्रकाशित होणार आहे.

कोरोना मानवनिर्मीत असल्याचा दावा ब्रिटिश प्राध्यापक अँगस डालगेश व नॉर्वेचे वैज्ञानिक बर्गक सोरेनसेन यांनी आपल्या रिसर्चमध्ये केला आहे. जगभरात थैमान घालत असलेला कोरोना विषाणू चीनने जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून तयार केला आहे. वुहानच्या प्रयोगशाळेतील चीनचे वैज्ञानिक यामध्ये होते. त्यानंतर त्यांनी कोरोना वटवाघळातूनच आला असे दाखवण्यासाठी त्याचे रूप त्या पद्धतीने बदलले व तो नैसर्गिक वाटेल अशा पद्धतीने रचना केली, असा गौप्यस्फोट रिसर्च पेपरमध्ये करण्यात आला आहे.

रिसर्चमध्ये म्हटले आहे की, सार्स सीओव्ही २ म्हणजे कोरोना विषाणूचा कोणताही नैसर्गिक पूर्वज नाही. हा विषाणू चीनच्या वैज्ञानिकांनी 'गेन फंक् शन' या प्रकल्पात कृत्रिमरीत्या तयार केला. वुहान प्रयोगशाळेत चीन संशोधकांनी पहिल्यांदा वटवाघळातील विषाणूंची रचना अभ्यासण्याचा प्रयत्न केला. चीनच्या गुहांमध्ये सापडलेल्या वटवाघळांतील विषाणू घेऊन त्याचे रूप काट्याप्रमाणे केले. त्याचे रूपांतर नंतर घातक कोविड-19 विषाणूत झाले. नंतर त्यांनी तो नैसर्गिक विषाणू असल्याचा बनाव केला. विषाणूमध्ये ज्या खुणा आढळतात त्यावरून मानवनिर्मित असल्याचे सिद्ध होते.

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेतील वैज्ञानिकांनीच कोरोनाचा कृत्रिम विषाणू तयार केला, असा आरोप ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनीही केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: ...अन् बदलला अल्पवयीन गुन्ह्याचा कायदा; पोर्शे प्रकरणात फडणवीसांनी दिला निर्भया केसचा संदर्भ

Matheesha Pathirana : IPL कामगिरीवर LPL मध्ये कमाई! इतिहास रचणाऱ्या पथिरानाला CSK पेक्षा मिळाले 80 लाख रूपये जास्त

HSC Result: बारावीनंतर नोकरी करायची आहे ? रेल्वेमध्ये करा उत्तम करिअर, टीटीई होण्यासाठी अशी करा तयारी

Indigo Flight : इंडिगोची फ्लाइट की रेल्वेचा जनरल डबा! ओव्हरबुक झाल्याने प्रवाशाचा उभे राहून प्रवास, अखेर...

Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT