corona 
ग्लोबल

जगात सर्वाधिक लसीकरण झालेल्या देशात कोरोना का वाढतोय?

कार्तिक पुजारी

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी लसीकरण हाच प्रमुख पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. यानुसार, अनेक देशात लसीकरण मोहिमेने वेग घेतलाय. अमेरिका, इस्त्रायल, ब्रिटन अशा काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण झालंय

नवी दिल्ली- कोरोना महामारीवर मात करण्यासाठी लसीकरण हाच प्रमुख पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. यानुसार, अनेक देशात लसीकरण मोहिमेने वेग घेतलाय. अमेरिका, इस्त्रायल, ब्रिटन अशा काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण झालंय. हिंद महासागरातील मदागासकरच्या उत्तरेला असलेल्या सेशल्स (Seychelles) देशामध्ये सर्वाधिक लसीकरण ( world's most vaccinated country for COVID-19) झालंय. असे असले तरी त्या देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत असल्याने एका वेगळ्याच चर्चेचा तोंड फुटलंय. सेशल्समध्ये जवळपास 71 टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस देण्यात आलाय, तर 62 लोकांना लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. असे असतानाही लस घेतलेल्या 37 टक्के लोकांना कोरोनाची लागण झालीये, तर 20 टक्के लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलंय. लसीकरण मोठ्या प्रमाणात होऊनही देशात कोरोना पसरत असल्याने चिंता वाढली आहे. (COVID is surging in Seychelles the world most vaccinated country)

लस घेऊनही कोरोनाची लागण

सेशल्स हा एक छोटा देश आहे. देशाची लोकसंख्या एक लाखांच्या जवळपास आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात कोरोनाची लागण होणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. देशात कोरोनाचा संसर्ग का वाढतोय, याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. सेशल्समध्ये 57 टक्के लोकांना चीनची सिनोफार्म Sinopharm लस देण्यात आली आहे, तर 43 टक्के लोकांना अॅस्ट्राझेनेका लस AstraZeneca (भारतात कोविशिल्ड म्हणून ओळखली जाणारी) देण्यात आलीये. सिनोफार्म लस देण्यात आलेल्या किंवा अॅस्ट्राझेनकाची लस देण्यात आलेल्या किती लोकांना कोरोनाची लागण झाली याचा स्वतंत्र्य डेटा उपलब्ध नाही.

वेगळ्या व्हेरिएन्टचा प्रभाव

वेगवेगळ्या व्हेरिएन्टवर काही लस निष्किय ठरत असल्याचंय दिसून येतंय. साऊन आफ्रिकेमध्ये आढळलेला B.1.351 व्हॅरिएन्ट, ब्रिटनचा B.1.1.7 किंवा भारतात आढळलेला B.1.617 व्हॅरिएन्टवर वेगवेगळ्या लशी वेगवेगळा प्रभाव दाखवत आहेत. सिनोफार्म लस या नव्या व्हॅरेएन्टवर प्रभावी ठरत नाहीये. शरीरात इम्युनिटी तयार होण्यासाठी उच्च-कार्यक्षमता असलेल्या लशीची आवश्यकता असते. लशीची कार्यक्षमता 60 टक्के असल्यास इम्युनिटी गाठली जात नाही. एका अभ्यासानुसार, लशीची कार्यक्षमता 90 टक्के असल्यास हर्ड इम्युनिटी तयार होण्यासाठी 66 टक्के लोकसंख्येचे लसीकरण आवश्यक आहे. तसेच लस 60 टक्के कार्यक्षम असलेल्या 100 टक्के लोकसंख्येचे लसीकरण आवश्यक आहे.

संपूर्ण जगाचे लसीकरण आवश्यक

जगातील काही देशांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर बनली आहे. शिवाय वेगवेगळे व्हेरिएन्ट आढळून येत आहेत. त्यामुळे एका देशाचे लसीकरण पूर्ण करुन काहीही फायदा होणार नाही. कोरोनाला हरवायचं असेल तर संपूर्ण जगातील नागरिकांचं लसीकरण आवश्यक आहे. तेव्हाच कोरोनाची साथ आटोक्यात येईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

सेशल्सचे आरोग्य अधिकारी डॉ. गेडेन यांच्या दाव्यानुसार, अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्यात आल्याने संसर्ग वाढत आहे. मार्च महिन्यामध्ये कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले. शिवाय पर्यटकांसाठीही देश सुरु करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विदेशी नागरिकांनी सेशल्सला भेट दिली. त्यांच्यासोबत वेगळा व्हेरिएन्टही देशात घुसला. दरम्यान, लसीकरण मोठ्या प्रमाणात करुनही कोरोनासंसर्ग वाढत असलेल्या सेशल्स देशाकडून जगाने काही शिकणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Temperature Drop: नागपुरात थंडीची लाट! तापमान १०.८ अंशांवर; नागरिकांना हुडहुडी

Sakal Suhana Swasthyam : अमृताकडे जाण्याचा मार्ग ज्ञानेश्वरीतून प्रशस्त; आध्यात्मिक योगगुरू श्री एम यांचे प्रतिपादन

FIFA World Cup 2026 : मेस्सी विरुद्ध रोनाल्डो QF मध्ये भिडणार; वर्ल्ड कप २०२६ चे गट जाहीर, डोनाल्ड ट्रम्प यांना 'शांतता' पुरस्कार

MPSC Exams 2026: एमपीएससी 2026 वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा, वनसेवा, गट-ब–क परीक्षांचे दिनांक स्पष्ट

Panchang 6 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT