Corona-Death 
ग्लोबल

अमेरिकेत कोरोनाचा कहर; मृतांचा आकडा लाखाच्याही पुढे

यूएनआय

वॉशिंग्टन - जगातील एकमेव महासत्ता असलेली अमेरिका दिवसेंदिवस कोरोनाच्या विळख्यात अडकतच चालल्याचे चित्र आहे. सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. सध्य स्थितीत अमेरिकेत जवळ जवळ १७ लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर  कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा एक लाखाच्याही पुढे गेला आहे. अमेरिकेच्या या परिस्थितीमुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

चीनच्या वुहान शहरातील उद्रेकानंतर कोरोना विषाणूचा सर्वात वेगाने संसर्ग युरोपात झाला. युरोपातील इटली, ब्रिटन, स्पेन आणि जर्मनी या देशात हाहाकार उडवून दिल्यानंतर कोरोना विषाणूचा केंद्र अमेरिकेत वळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जॉन्स हॉपकिन्स मेडिसिन युनिव्हर्सिटीने दिलेल्या रिपोर्ट नुसार अमेरिकेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६ लाख ९९ हजार ९३३ झालेली आहे. आणि मृतांचा आकडा १ लाख ४४२ इतका झाला आहे. तर जेमतेम ३ लाख ९७ हजार ५५२ नागरिकांनी कोरोनावर मात केली असल्याचे आकडे सांगतात.

त्यामुळे अमेरिकेला कोरोना विषाणूचा अधिकच फटका बसल्याचे दिसत आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक ३ लाख ५९ हजार ९३६ रुग्ण एकट्या न्यूयॉर्क शहरात असून, २९ हजार ४८४ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर न्यूजर्सी येथे सुमारे दीड लाखाहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि ११ हजार ३३९ नागरिकांचा अंत झाला आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास अमेरिकेत कोरोनामुळे १५ लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात; चीनचे स्पष्टीकरण
        
दरम्यान, संपूर्ण जगभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५६ लाख ९५ हजार २९० वर पोहचली असून, या विषाणूच्या संसर्गाने ३ लाख ५५ हजार ६९२ जणांचा जीव घेतला आहे. आणि दिलासादायक बाब म्हणजे जगभरात २३ लाख ४९ हजार ५९८ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT