soumya swaminathan
soumya swaminathan 
ग्लोबल

कोरोनावर डेक्सामेथासोन प्रभावी तर ऑक्सफर्डची ट्रायल थांबवणं हा वेक अप कॉल - WHO

सकाळ वृत्तसेवा

जिनिव्हा - संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलं आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना लशीच्या शोधासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. अनेक लशींची मानवी चाचणी सुरु आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं गुरुवारी म्हटलं की, कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक अशा प्रोडक्टसाठी मदतीसाठी योगदान द्यावं असं आवाहन केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा ACT-Accelerator programme आधीपासूनच व्हॅक्सिनच्या संशोधनासाठी काम करत आहे असं WHO चे संचालक टेड्रोस यांनी सांगितलं. 

लशीच्या शोध लागला तरी क्लिनिकल ट्रायल्स, निर्मिती, परवाने आणि त्याचं वितरण याची यंत्रणा उभा करणं आणि ती वाढवण्याची आवश्यकता असल्याचं टेड्रोस यांनी म्हटलं. डेक्सामेथासोन कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरत असल्याचं आणि त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण तब्बल 20 टक्के कमी होत असल्याचं आधीच सिद्ध झालं असल्याची उल्लेख WHOने पुन्हा एकदा केला.

व्हॅक्सिन आणि त्याच्या ट्रायलबाबत सांगताना टेड्रोस यांनी म्हटलं की, जगभरात सध्या 180 लशींवर काम सुरु आहे. त्यातील जवळपास 35 लशींची मानवी चाचणी सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

WHO ने म्हटलं होतं की, स्टेरॉइड औषधे कोरोनाचा संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णांना देता येतील. डेक्सामेथासोन औषधं दिल्यानंतर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी होत असल्याचं समोर आलं आहे. सुरुवातीची लक्षणं असलेल्या रुग्णांना हे औषध देण्याची गरज नसल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. 

ऑक्सफर्डच्या लशीच्या ट्रायलला स्थगिती
ऑक्सफर्डच्या अस्ट्राजेनेकाची ट्रायल जगभरात थांबवण्यात आल्याबद्दल जागतिक आरोग्य संघनटेला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं की, या ट्रायलमध्ये आजारी एखादी व्यक्ती आजारी पडणं हा आपल्यासाठी वेक अप कॉल आहे. पण यामुळे संशोधकांनी निराश होण्याचं कारण नाही. अशा अडचणींसाठी आपल्याला पूर्णपणे तयार रहावं लागेल. अनेक समस्या येतच राहतील. कोरोनाला संपवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT