doctor couple in new york city preparing will for 18 months son in coronavirus outbreak 
ग्लोबल

कोरोनामुळे डॉक्टर दाम्पत्य झाले भावूक अन् लिहीले मृत्यूपत्र...

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनामुळे अमेरिकेत 8 लाख 52 हजार 703 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 47 हजार 750 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अमेरिकेत सध्या हाहाकार माजला असून, डॉक्टर दांपत्याने आपल्या चिमुकल्यासाठी मृत्यूपत्र तयार केले आहे.

न्यूयॉर्कमध्ये कोरोनाने हाहाकार उडवला आहे. न्यूयॉर्कमध्ये मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. न्यूयॉर्कमधील वैद्यकिय कर्मचारीही जीव मुठीत धरून रुग्णांवर उपचार करत आहेत. यामध्ये डॉ. अ‍ॅडम (वय 37) आणि डॉ. नीना बुधीराजा यांचाही समावेश आहे. गेल्या एक महिन्यांपासून रात्रं-दिवस ते रुग्णांवर उपचार करत असून, त्यांना आपल्या 18 महिन्याच्या मुलाची काळजी आहे. मुलाच्या काळजीपोटी त्यांनी मृत्यूपत्र तयार केले आहे.

डॉ. अ‍ॅडम आणि डॉ. नीना यांच्या मते आमचा जर मृत्यू झाला तर आमच्या बाळाची काळजी कोण घेणार म्हणून मृत्यूपत्र तयार करत आहोत. डॉ. नीना यांनी सांगितले की, "गेल्या एका महिन्यापासून आम्ही दिवसरात्र रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि मृत्यू पाहत आहोत. वैद्यकीय कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत आहेत. दिवसागणीक संघर्ष सुरू आहे. दररोजची परिस्थिती पाहून नोकरी सोडण्याचा विचार केला होता. पण, या परिस्थितीत माघार घेऊ शकत नाही. गेल्या आठवड्यात अ‍ॅडमचा मित्राचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मनात सतत विचार सुरू आहेत. आमच्यानंतर मुलाचे काय होईल? म्हणून मुलासाठी मृत्यूपत्र तयार केले आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

Satyendra Jain: आप नेते सत्येंद्र जैन यांना अटक! एसीबीची मोठी कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर संताप

Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT