Surgery  Team eSakal
ग्लोबल

पोटदुखीमुळे दवाखान्यात आला अन् पोटात निघालं किलोभर 'लोखंड'

पोटात नट, बोल्ट आणि चाकू आढळल्यानं डॉक्टरही झाले हैराण

सुधीर काकडे

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना डॉक्टरांसमोर रोज नवी आव्हानं येत असतात. वेगवेळ्या आजारांवर उपचार करताना डॉक्टरांना रोज वेगवेळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. अशाच एका प्रकरणात डॉक्टरांनी विचित्र आजाराने ग्रासलेल्या एका व्यक्तीला वाचवलं आहे. या व्यक्तीला लोखंडी वस्तू खायला आवडत असल्याची धक्कादायक बाब डॉक्टरांनी दिलेल्या माहितीमधून समोर आली आहे.

यूरोपच्या लिथुआनिया मध्ये घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीला काही दिवसांपासून पोट दुखीचा त्रास होत होता. त्यानंतर तो डॉक्टरांकडे गेला आणि भयानक वेदना होत असल्याचे डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासणीसाठी एक्स-रे काढला आणि त्यामधून जे समोर आलं त्यामधून अविश्वसनीय बाब समोर आली. त्यावेळी त्यांनी या रुग्णाच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. डॉक्टरांनी या व्यक्तीच्या पोटातील वस्तू बाहेर करण्यासाठी जेव्हा पोटाची शस्त्रक्रिया केली. यावेळी डॉक्टरांनी तब्बल एक किलो लोखंड बाहेर काढलं. यामध्ये नट-बोल्ट, स्क्रु, खिळे आणि चाकू या गोष्टी सापडल्या. या व्यक्तीला लिथुआनियामधील क्लाईपेडा युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार या व्यक्तीने स्वत: कबूल केलं की आपल्याला लोखंडी वस्तू खायला आवडतात. या व्यक्तीला दारु पिण्याची सवय होती. काही दिवसांपूर्वीच त्याने दारू सोडली होती. मात्र दारुचे व्यसन सोडवताना ही व्यक्ती चक्क लोखंडी वस्तू खायला लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT