doctors remove dead fish from chinese man video viral 
ग्लोबल

मासा घुसला शरीरात अन् झाली तडपड...

वृत्तसंस्था

बीजिंग (चीन): एका व्यक्तीच्या शरीरात जिवंत मासा घुसल्यामुळे त्याला त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून मासा बाहेर काढला. पण, संबंधित युवकाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण चीनच्या गुआंगडोंग प्रांतातील एका युवकाच्या शरीरात 16 इंच लांब असणाऱया माशाने गुदद्वारे प्रवेश केला. यामुळे त्याला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यानंतर तडफडू लागला. उपचारासाठी रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांना फक्त पोट दुखत असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी एक्स रे काढल्यानंतर त्यांना धक्काच बसला. युवकाच्या पोटामध्ये मोठा मासा असल्याचे दिसत होते. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून मासा बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आणि मासा बाहेर काढला. पण, युवकाच्या पोटामध्ये मासा गेलाच कसा, असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता.

दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर युवक शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांनी मासा शरीरात कसा गेला, याबाबत विश्वासात घेऊन विचारणा केली. यावेळी त्याने माशांवर बसलो असताना एका माशाने शरीरात प्रवेश केल्याचे सांगितले. पण, लाजेखातर हे लपवून ठेवले होते. डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये डॉक्टर या व्यक्तीच्या मलाशयातून 16 इंचाचा मासा काढताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT