Dominos 
ग्लोबल

Domino's Viral Video: डॉमिनोजच्या कर्मचाऱ्याने आधी नाकात बोट घातले अन् नंतर...; किळसवाणा व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर जापानमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. डॉमिनोज शॉपमधील हा व्हिडिओ असून नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Dominos restaurant Japan Employee )

कार्तिक पुजारी

टोकियो- कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टराँची प्रतिष्ठा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली स्वच्छता, पदार्थांची गुणवत्ता आणि चव अशा काही गोष्टींवर अवलंबून असते. अन्नपदार्थ बनवताना स्वच्छता कशी ठेवली जाते, सर्व स्वच्छतेचे प्रोटोकॉल पाळले जातात का? अशा गोष्टी महत्त्वाच्या असतात. अशाच ठिकाणांना ग्राहकांची पसंती मिळत असते. मात्र, सध्या सोशल मीडियावर जापानमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. डॉमिनोज शॉपमधील हा व्हिडिओ असून नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

डॉमिनोजच्या शॉपमध्ये एक कर्मचारी आपल्या नाकात बोट घालतो आणि त्यानंतर पिझ्झाच्या मळलेल्या पीठाला तेच बोट पुसतो. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. डॉमिनोजच्या प्रतिष्ठेला हा मोठा धक्का आहे. डॉमिनोजने याची गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी माफी मागितली आहे. (Dominos restaurant Japan Employee Touches Pizza Dough After Picking Nose video viral)

मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी पार्टटाईम काम करतो. त्याच्यावर कामगार कायद्यानुसार कारकाई करण्यात येणार आहे. शिवाय डॉमिनोजने अमागास्की सीटीतल ह्युगो प्रिफेक्टर शॉप तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्याने रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार केलाय. एकाने या घटनेचा व्हिडिओ तयार केला. जापान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

डॉमिनोजने याप्रकरणी सांगितलंय की, कर्मचाऱ्याने मळलेले पीठ टाकून देण्यात आले आहे. तसेच अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. आमच्या बहुमल्य ग्राहकांना असहज केल्याप्रकरणी आम्ही त्यांची माफी मागतो. संस्थेत सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाते. स्वच्छतेबाबत आम्ही पूर्णपणे बांधील आहोत. दरम्यान, ग्राहकांनी या किळसवाण्याप्रकाराला गंभीर म्हटलं आहे. तसेच याप्रकरणी कडक कारवाईची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT