trump. 
ग्लोबल

Donald Trump Impeachment: ट्रम्प यांचा मोठा विजय; हिंसेप्रकरणी दोषी नाहीत

सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रम्प यांच्यावरील महाभियोग टळला आहे. अमेरिकेच्या सिनेटमधील महाभियोगाच्या प्रस्तावावरील चर्चेनंतर ट्रम्प यांना 6 जानेवारी 2021ला वॉशिंग्टन कॅपिटॉल हिलमध्ये झालेल्या हिंसेप्रकरणी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. पाचव्या दिवशीच्या सुनवाणीनंतर सिनेटमध्ये मतदान घेण्यात आले. 

Love Matters : तृतीयपंथीचं भारतातील पहिलं 'ओपन मॅरेज' ठरलेल्या जय-...

मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान ट्रम्प यांच्या बाजूने 43 मतं पडली, दुसरीकडे त्यांच्याविरोधात 57 सिनेटर्संनी मतदान केले. अशाप्रकारे ट्रम्प यांना दोषी ठरवण्यासाठी लागणारे एक तृतीयांश मतं पडू शकली नाहीत. त्यामुळे कॅपिटॉल हिलमध्ये झालेल्या हिंसेप्रकरणी त्यांची सुटका करण्यात आली आहे. अमेरिकी माध्यमांनी यासदर्भातील वृत्त दिलं आहे. 

दुसऱ्यांदा महाभियोगाचा सामना करणारे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वकीलांनी सिनेटमध्ये बाजू मांडताना सांगितलं की, ट्रम्प यांच्यावर हिंसा भडकवण्याचा आरोप करण्यात आला आहे. हे सर्वात मोठे असत्य आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार वकील मायकल वैन डर वीन म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात डेमोक्रॅटिक खासदारांनी महाभियोगाची सुरु केलेली प्रक्रिया राजकीय हेतुने प्रेरित आहे. 

6 जानेवारीला झाली होती हिंसा

ट्रम्प यांच्यावर 6 जानेवारीला अमेरिकेचे संसद कॅपिटॉल हिलमध्ये दंगे भडकवण्याचा आरोप होता, ज्यात पाच लोकांचा मृत्यू झाला होता. असे असले तरी त्यांनी या आरोपांचे खंडन केले होते. यावेळी अधिकतर रिपब्लिकन खासदारांनी ट्रम्प यांच्याविरोधात मदतान न करण्याचे संकेत दिल होते. आजची सुनावणीची प्रक्रिया पार पडण्यास 4 तासांचा वेळ लागला. 

ई-सकाळ नॉलेज : स्पर्धा परीक्षेची तयारी करता? मग "या' महत्त्वाच्या...

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाची सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सिनेटमध्ये त्यांच्या वकीलांनी ट्रम्प यांच्यावरील आरोप नाकारले होते. ट्रम्प यांच्या भाषणामुळे लोकांना चिथावणी मिळून त्यांनी ६ जानेवारीला कॅपिटॉल इमारतीत हिंसाचार केल्याचा आरोप होता. मात्र, भाषणाचा आणि हिंसाचाराचा काहीही संबंध नव्हता, असा दावा ट्रम्प यांच्या वकीलांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव लोकप्रतिनिधीगृहात बहुमताने मंजूर केला होता. त्यानंतर सिनेटमध्ये सुनावणी सुरु झाली. याठिकाणी ठराव मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्‍यक होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC crisis: बंगालमध्येही महाराष्ट्र पॅटर्नची चाहूल? TMC आमदारांच्या एका गुप्त बैठकीमुळे खळबळ, ममता बनर्जींच्या हातातून पक्ष जाणार?

UP: पाकिस्तानमधून विस्थापित झालेल्या १,६४५ कुटुंबांना योगींनी दिला जमिनीचा मालकी हक्क! गाझियाबादच्या घटनेवर कडक इशारा

Devendra Fadnavis : मंत्रालयातील वाढत्या गर्दीवर कायमस्वरुपी तोडगा, मंत्रालयाची जागा बदलणार?; सीएम देवेंद्र फडणवीसांचा निर्णय

Latest Marathi News Live Update : काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

Pune Phugewadi Case: फुगेवाडीप्रकरणी अनेक मृत नोंदीबाहेर; प्रशासकीय आकडा अकरा, प्रत्यक्षात मात्र १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT