trump new party
trump new party 
ग्लोबल

'शर्यत अजून संपली नाही कारण...'; ट्रम्प स्थापणार 'राष्ट्रभक्त' नावाचा नवा पक्ष?

सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली राष्ट्राध्यक्ष पदाची जागा सोडताना अनेक गोंधळ घातलेले पहायला मिळाले. आज अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन शपथ घेणार आहेत. तर दुसरीकडे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नवा पक्ष स्थापन करणार असल्याच्या बातम्या अमेरिकन माध्यमांत चर्चेत आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प हे नवा पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यांनीही आपल्या जवळच्या लोकांसोबत याबाबतची चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असून त्याचं नाव ते 'The Patriot Party' असं देणार असल्याचं समजतंय. हा पक्ष संपूर्णत: राष्ट्रवादी विचारांचा नवा पक्ष असणार असल्याची चर्चा आहे. याबाबतच्या वृत्ताला अद्याप ट्रम्प यांच्याकडून कसलाही दुजोरा मिळाला नाहीये. मात्र अमेरिकन माध्यमांत याच्या चर्चा सुरु आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून येण्याबाबतचा आत्मविश्वास तगडा होता. मात्र, तीन नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यानच आपला पराभव होतोय, हे स्पष्ट झाल्याबरोबर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या निवडणुकीत घोटाळा झाल्याचा कांगावा करत त्यांनी अनेक राज्यांमधील निकालांना आव्हान दिले. या साऱ्याच्या  पार्श्वभूमीवर अमेरिकेचा रितसर निकाल यायला उशीर झाला.

6 जानेवारी रोजी औपचारिकरित्या अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षाची घोषणा होणार होती. मात्र, त्यावेळी ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिलवरच हल्लाबोल केला. जबरदस्ती घुसखोरी करत धुमाकूळ घातला. समर्थक आणि पोलिस यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत पाच जणांचा मृत्यू झाला होता. ट्रम्प यांच्या चिथावणीखोर वक्तव्यानेच ही घटना घडल्याचे जबाबदार ठरवून ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव आणण्यात आला. शिवाय तो मंजूर देखील झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपिटल हिंसेचा निषेध केला असला तरीही त्यांच्याच भडकाऊ वक्तव्यांमुळे ही घटना घडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवत अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी त्यांच्यावर बंदी घातली आहे. 

अमेरिकेमध्ये आज जो बायडन देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. तर, मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं फेअरवेल स्पीच दिलं आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून या आपल्या शेवटच्या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा कॅपिटल हिलमध्ये झालेल्या हिंसेचा उल्लेख केला. तसेच त्यांनी या घटनेला अमेरिकेच्या मुल्यांच्या विरोधातील घटना असं म्हटलं.

जो बायडन आज घेणार शपथ
जो बायडन आज अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्राध्यक्षाच्या स्वरुपात शपथ घेणार आहेत. जगातील महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या संयुक्त राज्य अमेरिकेची सत्ता बुधवारी अधिकृतरित्या रिपब्लिकन पक्षाकडून डेमोक्रॅटीक पक्षाकडे जाणार आहे. जो बायडन अमेरिकेचे सर्वांत वयस्कर तसेच 46 वे राष्ट्राध्यक्ष असतील. या शपथविधीच्या अनुषंगाने कडक सुरक्षा व्यवस्था केली गेली आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी कडक सुरक्षा तैनात केली गेली आहे. गेल्या 6 जानेवारी रोजी ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल हिलवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या शपथविधीवर धोक्याचं सावट आहे. त्यामुळे हरतर्हेने खबरदारी घेतली जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT