Donald Trump esakal
ग्लोबल

Donald Trump: 'माझ्या वडिलांचं निधन झालं' डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाच्या ट्विटमुळे खळबळ

डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांचे (ट्विटर) X खाते हॅक करण्यात आले आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांचे (ट्विटर) X खाते हॅक करण्यात आले आहे. त्यांच्या हॅक करण्यात आलेल्या खात्यावरून सातत्याने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या जात आहेत. मात्र, हे खाते हॅक झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचे निधन झाल्याचे त्यांच्या X खात्यावरून पोस्ट करण्यात आले आहे, जे खोटे आहे.

या खात्यावर अनेक प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या विरोधात अपशब्द लिहिले जात आहेत. इलॉन मस्कबद्दलही एक पोस्ट देखील शेअर करण्यात आली आहे.

हॅकरने डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्या X खात्यावरून पोस्ट केले आहे की, 'माझे वडील डोनाल्ड ट्रम्प यांचे निधन झाले आहे. ते या जगात नाहीत हे सांगताना मला खूप वाईट वाटत आहे. मी 2024 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेत आहे.'

उत्तर कोरियाला उध्दवस्त केले जाईल, अशीही पोस्ट डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्या X खात्यावरून पोस्ट करण्यात आली आहे. या सर्व पोस्ट पाहता हे अकाउंट हॅक झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या अकाऊंटवरून हॅकर अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना सतत शिवीगाळ करत आहे. इतकेच नव्हे तर नाही तर (ट्विटर) एक्सचे मालक इलॉन मस्क यांच्याबाबतही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या जात आहेत. हॅकरने लोगन पॉलबाबतही आक्षेपार्ह पोस्ट केल्या आहेत. या सगळ्यामागे कोणाचा हात आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT