donald trump reaction on pfizer vaccin anouncement 
ग्लोबल

कोरोना लशीची घोषणा करणाऱ्या फायझर कंपनीवर ट्रम्प भडकले

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन - कोरोना विषाणूविरोधात तयार होत असलेल्या लशीला यश मिळत असल्याचे ‘फायझर’ आणि अन्न व औषध प्रशासनाने दडवून ठेवले, त्यामुळे कोरोना या मुद्यावरून मत मिळविण्याची आपली संधी हुकली, असा संताप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज व्यक्त केला. ‘या लशीच्या आधारावर मला विजय मिळावा, असे त्यांना वाटतच नव्हते. त्यामुळे मी जे गेले दोन महिने सांगत होतो, ते त्यांनी मतदानानंतर आठवडाभराने सांगितले,’ असे ट्वीट ट्रम्प यांनी केले आहे.

फायझर या औषध निर्माण कंपनीने ते करत असलेल्या लशीची परिणामकारकता ९० टक्के असल्याचे काल जाहीर केले. या लशीमुळे शरीरातील कोरोना विषाणूचा प्रादर्भाव मोठ्या प्रमाणात रोखता येतो, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत कोरोनाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. ट्रम्प प्रशासनाला संसर्गस्थिती हाताळता आली नाही, असा दावा करत डेमोक्रॅटिक पक्षाने मात्र आपली सर्व योजना तयार असल्याचे सांगितले होते.

सर्वाधिक संसर्ग आणि सर्वाधिक मृत्यू असलेल्या अमेरिकेत या मुद्याचा चांगलाच प्रभाव पडला. चाचणी अंतिम टप्प्यात आली असून यश मिळत आहे, असे ट्रम्प यांनी वारंवार सांगितले होते. या पार्श्वभूमीवर ‘फायझर’ने लशीबाबत मतदानानंतर घोषणा केल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. ‘ज्यो बायडेन अध्यक्ष असते तर पुढील चार वर्षे लस मिळाली नसती. आम्ही या चाचण्यांना तत्काळ मान्यता दिली होती. मात्र मला त्यांना जिंकूच द्यायचे नव्हते. राजकीय कारणांसाठी नव्हे, तर हजारो जणांचे जीव वाचविण्यासाठी तरी लशीची आधीच घोषणा होणे आवश्‍यक होते,’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी आपली हात मानण्यास आजही नकार दिला आहे. त्यांच्या पक्षाच्या दहा ॲटर्नी जनरलनी आज सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करताना टपालाद्वारे मतदान करण्याची परवानगी देणारा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवावा, अशी मागणी केली आहे. नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मात्र, आपले संभाव्य मंत्रिमंडळ आणि ‘व्हाइट हाउस’मधील कर्मचारी यांच्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. बायडेन यांच्या नेतृत्वाखाली नवा इतिहास घडवू, असा विश्‍वास नियोजित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Interest Rate: गुड न्यूज! 'पीएफ'च्या व्याजदरांमध्ये मोठी वाढ; चालू महिन्यातच खात्यात पैसे जमा होणार?

TCA: मोहम्मद सिराज, तिलक वर्मा आणि अंबाती रायडू अडचणीत? पाठवण्यात आली कायदेशीर नोटिस; नेमकं काय आहे प्रकरण?

Work Visa Rules: सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! वर्क व्हिसा नियम बदलले; भारतीय कामगारांवर काय परिणाम होणार?

Vaibhav Sooryavanshi ला 'राड्या'नंतर बीसीसीआयने एकटे पाडले; सचिव देवजित सैकिया म्हणाले, आम्ही या प्रकरणात...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

SCROLL FOR NEXT