donald trump 
ग्लोबल

माझा मुलगा 15 मिनिटात कोरोनामुक्त झाला; ट्रम्प यांचा अजब दावा

सकाळ वृत्तसेवा

पेन्सिलवेनिया - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक धक्कादायक अशी वक्तव्ये केली आहेत. आताही त्यांनी खळबळजनक दावा करताना म्हटलं की, माझा मुलगा बॅरन फक्त 15 मिनिटात कोरोनामुक्त झाला. ट्रम्प यांनी सोमवारी पेन्सिलवेनियातील रॅलीवेळी त्यांच्या समर्थकांसोबत चर्चा करताना हा दावा केला. ट्रम्प यांनी फस्ट लेडी मेलानिया आणि मुलगा 14 वर्षीय बॅरनला ऑक्टोबरमध्ये झालेल्या कोरोना संसर्गाबद्दल बोलताना ही माहिती दिली. 

मुलाची प्रतिकारशक्ती चांगली असल्याचं सांगताना ट्रम्प यांनी डॉक्टरांसोबतच्या चर्चेचा उल्लेख केला. बॅरनची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी दिलेली माहिती सांगितली. तेव्हा बॅरनचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 15 मिनिटांनी दुसऱ्यांदा चौकशी केली तेव्हा डॉक्टरांनी धक्कादायक माहिती दिली की तो कोरोनामुक्त झाला आहे.

ट्रम्प यांनी पेन्सिलवेनियाच्या निवडणूक रॅलीमध्ये शाळा उघडण्यासाठी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सांगितलं की, अनेक राज्ये ट्रम्प त्यांच्या विचारांशी सहमत नाहीत. आरोग्यसंबंधी काळजीमुळे शाळा उघडण्यास नाही म्हणत आहेत. देशात होत असलेल्या निवडणूक रॅलीमध्ये मुलाचा किस्सा सांगून शाळा पुन्हा उघडण्यात याव्यात यासाठी नागरिकांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

शाळा उघडण्यासाठी ट्रम्प हालचाली करत आहेत. पण दुसऱ्या बाजुला अमेरिकेतील कोरोनाची आकडेवारी भीतीदायक आहे. अमेरिकेत 7 लाख 92 हजार कोरोनाबाधित असून 22 ऑक्टोबरपर्यंत कऱण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार अशी माहिती समोर आली की यापैकी मुलांची संख्या 11 टक्के इतकी आहे.

अमेरिकेतील खूपच कमी राज्यांनी रुग्णालयात दाखल होणाऱ्या आणि मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा डेटा वयाच्या आधारे तयार केला आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या मुलांची संख्या खूपच कमी असल्याचं नोंदवलं आहे. रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये मुलांचे प्रमाण हे केवळ 1 ते 3.6 टक्के इतकं होतं. तर मृत्यूचे प्रमाण 0.23 टक्क्यांपर्यंत होतं. तब्बल 16 राज्यांनी त्यांच्याकडे कोरोनामुळे मुलांचा मृत्यू झाला नसल्याचे सांगितले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT