Donald Trump shooting T-shirts 
ग्लोबल

Donald Trump : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार अन् अवघ्या दोन तासात चीनमध्ये छापले गेले टी-शर्ट

Donald Trump shooting : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारातनंतर अवघ्या काही तासात या हल्ल्यासंबंधीचे टी-शर्ट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळाले.

रोहित कणसे

अनेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील एका रॅलीमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान या घटनेला अवघे दोन तास उलटत नाहीत त्याआधी चायनीज कंपन्यांनी यासंबंधीचे टी-शर्ट्स बाजारात विक्रीसाठी आणले आहेत. या टी-शर्टवर गोळीबार झाल्यानंतरचा ट्रम्प यांचा फोटो प्रींट करण्यात आला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, Taobao (चीनचे सर्वात मोठे ऑनलाइन मार्केट) विक्रेते ली जिनवेई यांनी सांगितलं की, आम्ही शुटिंगची बातमी बघताच Taobaoवर टी-शर्ट टाकले, तेव्हा आम्ही ते प्रींटही केले नव्हते आणि अवघ्या तीन तासांत आम्हाला चीन आणि अमेरिका या देशांमधून 2,000 हून अधिक ऑर्डर मिळाल्या.

उत्पादन आणि विक्रीची गती डिजिटल प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वाढली आहे, ज्यामुळे हे टी-शर्ट विक्रमी वेगात छापले गेले आणि विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले.

निवडणुक काळात अशा टी-शर्ट्सना तुफान मागणी असते. यादरम्यान गुआंगडोंग येथील Xinflying डिजिटल प्रिंटिंग प्रॉडक्शन नावाच्या कंपनीने माहिती दिली की, त्यांची डिजिटल प्रिंटिंग मशीन प्रति तास 8 निवडणूक संबंधित टी-शर्ट प्रिंट करू शकते.

अनेक देशात होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, चायनीज क्रॉस-बॉर्डर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म DHgate वर निवडणूक-संबंधित वस्तुंच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये जानेवारीपासून महिन्या-दर-महिन्यात 40% पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळली, तर मार्चमध्ये ही वाढ 110% पेक्षा जास्त होती.

ट्रम्प यांच्यावरील गोळीबारानंतर टी-शर्ट बाजारात उपलब्ध होणं शक्य झालं कारण, या टी-शर्ट कंपन्यांनी या हल्ल्यासंबंधीचे फोटो डाउनलोड केले आणी डीजिटल प्रींटींगच्या मदतीने थेट टी-शर्टवर प्रींट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT