Pakistan Donkey Population Esakal
ग्लोबल

Donkey Population : चीनमुळे पाकिस्तानात वाढली गाढवांची संख्या; पाहा नेमकं काय आहे प्रकरण

लोकांना एक वेळचं जेवण मिळत नसताना, पाकिस्तानात गाढवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Sudesh

पाकिस्तानात सध्या अत्यंत बिकट परिस्थिती आहे. एकीकडे अन्नधान्याचा तुटवडा आहे, तर दुसरीकडे महागाईने उच्चांक गाठलाय. लोकांना एक वेळचं जेवण मिळत नसताना, पाकिस्तानात गाढवांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या गोष्टीचा पाकिस्तानचा जवळचा मित्र चीन कारणीभूत आहे.

गेल्या तीन वर्षांमध्ये पाकिस्तानातील गाढवांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे. चीनमध्ये निर्यात करता यावी, यासाठी पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात गाढवं वाढवण्यात येत आहेत. गाढवांसोबतच पाकिस्तानातून श्वानांचीही निर्यात चीनमध्ये होते.

जगात तिसरा नंबर

गाढवांच्या संख्येत पाकिस्तानचा जगात तिसरा नंबर लागतो. एका सर्वेक्षणानुसार पाकिस्तानात २०१९-२० या वर्षी पाकिस्तानात ५५ लाख गाढवं होती. तर, २०२२-२३ या वर्षात देशातील गाढवांची संख्या ५८ लाखांवर गेली आहे.

तीन हजार एकरचा फार्म

चीन यापूर्वी नायजेर आणि बुर्किना फासो या आफ्रिकी देशांमधून गाढवं आयात करत होता. मात्र, या देशांनी गाढवांची निर्यात बंद केल्यानंतर चीनने पाकिस्तानला मदत मागितली. चीनची ही मागणी पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान सरकारने पंजाब प्रांतातील ओकारा जिल्ह्यात तब्बल तीन हजार एकर मोठा फार्म उभारला आहे.

चीनला का गरज?

चीनमध्ये गाढवांच्या त्वचेपासून जिलेटिन काढलं जातं. पारंपारिक चिनी औषध बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. यासाठी मोठ्या प्रमाणात गाढवांची कत्तल केली जाते. यामुळेच चीनमधील गाढवांची संख्या कमी झाली आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी चीन पाकिस्तानातून गाढवं आयात करत आहे. एशियानेट न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Video : 'या' शाळेत झालं आहे आशा भोसले यांचं शिक्षण, स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितल्या होत्या कोल्हापूरच्या गोड आठवणी

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

Mumbai local grocery shops: मुंबई लोकल स्थानकांवर पहिल्यांदाच किराणा दुकाने; कसारा, वासिंद, मानखुर्द येथे ‘प्रवासातच खरेदी’ची नवी सुविधा

Maharashtra: महसूल विभागात प्रतिनियुक्तीबाबत कडक निर्बंध लादले; महायुती सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या अधिकाऱ्यांना लागू होणार?

‘फार थोडे दिवस राहिलेत’ आशा भोसले यांचं भावूक वक्तव्य पुन्हा चर्चेत, म्हणालेल्या...'आता माझं वय झालय'

SCROLL FOR NEXT