ग्लोबल

धुम्रपानानंतर सॅनिटायझर वापरणं पडलं महागात

सॅनिटायझरचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु...

शर्वरी जोशी

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सध्या तरी कोणतंच औषध उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळे या काळात स्वच्छता बाळगणं आणि सॅनिटायझरचा वापर करणं अनिवार्य झालं आहे. कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यास किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरतांना सॅनिटायझरचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु, एका व्यक्तीला धुम्रपान करताना सॅनिटायझरचा (sanitizer) वापर करणं चांगलंच महागात पडलं आहे. धुम्रपान (smoking) व सॅनिटायझर (sanitizer) यांचा एकत्र संपर्क आल्यामुळे या व्यक्तीची संपूर्क कार जळून खाक झाली आहे. (driver was smoking car bursts into flames)

अमेरिकेतील Maryland येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या कारमध्ये ठेवलेल्या हॅण्ड सॅनिटायझरमुळे त्याच्या कारला आग लागली आहे. विशेष म्हणजे ही आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की, ज्यामुळे त्याची आख्खी गाडी जळून खाक झाली आहे.

नेमकी कशी लागली आग?

Montgomery County Fire and Rescue Service च्या माहितीनुसार, संबंधित इसम त्याच्या कारमध्ये बसून स्मोकिंग करत होता. यावेळी त्याच्या कारमध्ये सॅनिटायझरदेखील होते. या दोघांचा परस्पर संपर्क आल्यामुळे ही आग लागल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने प्रसंगावधान राखत पेटलेल्या कारमधून बाहेर उडी मारल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. सध्या या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, सॅनिटायझरमध्ये इथेनॉल किंवा isopropanol असतं. हे दोन्ही पदार्थ ज्वालाग्राही आहेत. त्यामुळे स्मोकिंग करतांना ही आग लागली. यापूर्वीदेखील अशा अनेक घटना घडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT