Ajay Ogula esakal
ग्लोबल

Lucky Draw : भारतीय ड्रायव्हरचं रातोरात नशीब फळफळलं; दुबईत लागली तब्बल 33 कोटींची लॉटरी!

दक्षिण भारतातील एका छोट्या गावात राहणारा ओगुला चार वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात यूएईला आला होता.

सकाळ डिजिटल टीम

दक्षिण भारतातील एका छोट्या गावात राहणारा ओगुला चार वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात यूएईला आला होता.

दुबईतील (Dubai) भारतीय वंशाचा व्यक्ती 'जॅकपॉट'मध्ये रातोरात करोडपती झालाय. आपला विश्वास बसत नाही ना? पण, हे खरं आहे. भारतीय व्यक्तीनं अमिरातीमध्ये 'लकी ड्रॉ'त (Lucky Draw) 15 दशलक्ष दिरहमची (33 कोटी रुपये) लॉटरी जिंकलीये.

जॅकपॉट जिंकल्यानंतर तो म्हणाला, 'मला अजूनही यावर विश्वास बसत नाहीये. चार वर्षांपूर्वी मी नोकरीच्या शोधात भारतातून दुबईत आला होतो, तेव्हापासून मी एका फर्ममध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. महिन्याला मला 3200 इतका पगार मिळतो.'

'मला अजूनही विश्वास बसत नाही'

अजय ओगुलानं (Ajay Ogula) दुबईतील एमिरेट्स ड्रॉमध्ये (Emirates Draw) 15 दशलक्ष दिरहमचं (33 कोटी) बक्षीस जिंकलंय. लॉटरी बक्षीस जिंकल्यानंतर ओगुला पुढं म्हणाला, 'मला अजूनही विश्वास बसत नाही की मी जॅकपॉट मारला आहे.'

UAE दैनिक खलीज टाईम्सनं अजय ओगुलाच्या हवाल्यानं म्हटलंय की, दक्षिण भारतातील एका छोट्या गावात राहणारा ओगुला चार वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात यूएईला आला होता. सध्या एका ज्वेलरी फर्मसाठी ड्रायव्हर म्हणून तो काम करत आहे. त्याला महिन्याला 3,200 रुपये पगार दिला जातो, असं खलीज टाईम्सनं वृत्त दिलंय.

'जिंकलेल्या रकमेतून चॅरिटी ट्रस्ट उघडणार'

ओगुला म्हणाला, या रकमेतून मी माझा चॅरिटी ट्रस्ट उघडणार आहे. त्यामुळं माझ्या गावात आणि आजूबाजूच्या गावातील अनेक लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास मदत होईल. जेव्हा मी ही बातमी माझ्या आई आणि भावंडांना सांगितली, तेव्हा माझ्या बोलण्यावर कोणी विश्वासच ठेवायला तयार नव्हतं. दरम्यान, याच ड्रॉमध्ये 50 वर्षीय ब्रिटिश महिला पॉला लीचनं 77,777 बक्षीस जिंकलंय. ही महिला 14 वर्षांपासून यूएईमध्ये मानव संसाधन व्यावसायिक म्हणून काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Kolhapur Dussehra : कोल्हापूरसाठी 'हा' कसला मानाचा तुरा, म्हणे राज्याचा प्रमुख महोत्सव; शाही दसऱ्यासाठी निधीच नाही

World Wrestling Championship 2025 : भारताच्या सुजीतची कडवी झुंज अपयशी, ऑलिंपिक विजेत्या रहमानचा ६-५ने विजय

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

SCROLL FOR NEXT