Shivrajyabhishek Sohala in Dubai
Shivrajyabhishek Sohala in Dubai 
ग्लोबल

Shivrajyabhishek : शिवप्रेरणा घेत युवकांनी जगभरात प्रगती साधावी; दुबईतील सोहळ्यात कोल्हेंचे आवाहन

मतीन शेख

दुबई : शिवराज्याभिषेक दिन म्हणजे स्वराज्यातील अठरापगड जातींच्या मावळ्यांना घेऊन केलेली एक सामाजिक क्रांती होती. शिवरायांच्या कडून प्रेरणा घेत आयुष्यात वाटचाल करावी. शिवराय वाचून, समजून घेऊन त्यांचे विचार आचरणात आणावे. तसेच आज-कालच्या युवकांनी दगड उचलून दंगल करण्यापेक्षा शिवप्रेरणा घेऊन जगभरात प्रगतिशील वाटचाल करावी हा संदेश ज्येष्ठ सिने अभिनेते संसदरत्न डॉ. अमोल कोल्हे यांनी दुबई येथील मराठी शिवप्रेमींना दिला.

सर्वसमावेशक, आदर्श शासनकर्ते, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती मराठा साम्राज्य (सीएमएस) ग्रुप, दुबई यांच्यातर्फे दुबई येथे पहिला शिवराज्याभिषेक दिन सोहळा १८ जून २०२३ रोजी जे.एस.एस. प्राइवेट स्कूल, दुबई येथे साजरा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य हे एका राजाचे नव्हते, तर ते रयतेचे होते. शिवराज्याभिषेक हा स्वराज्यातील रयतेच्या स्वातंत्र्याचा सोहळा होता. हा रयतोत्सव होता, असं वक्तव्य डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. याचबरोबर त्यांनी शिवरायांची विविध गुणवैशिष्ट्ये दुबईमधील शिवप्रेमींच्या समोर मांडली.

यावेळी शिवाजी महाराजांच्या जगभरात असलेल्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन इतिहास संशोधक, मराठा पातशहा पुस्तकाचे लेखक केतन पुरी यांच्या माध्यमातून भरवण्यात आले होते. केतन पुरी यांनी शिवराय कसे दिसायचे, त्यांचे चित्र, चरित्र, चारित्र्य कसे होते? ०६ जून, रायगड आणि शिवराज्याभिषेक दिन याचे महत्त्व आणि ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे वर्णन दुबईकरांना सांगितले.

शिवशाहीर प्रा. मुकुंदा भोर पाटील यांच्या गगनभेदी आवाजात विश्ववंदनीय शिवराय, क्रांतिसिंह नाना पाटील आणि या देशाला जिजाऊ चा शिवबा पाहिजे हे पोवाडे गाण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना आणि विक्रम भोसले, मुकुंदराज पाटील यांच्या पहाडी आवाजातील शिवगर्जनेने झाली. सीएमएस ग्रुप आणि त्यांच्या कार्या संदर्भात अभिजीत देशमुख यांनी सखोल माहिती सांगितली.

०६ जूनचे औचित्य साधून विनायक पवार यांच्या माध्यमातून दुबई येथे चित्रकला स्पर्धेचे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील महिलांनी सुरू केलेल्या दुबईमधील मधील पहिल्या "स्वामिनी" महिला ढोल ताशा पथक यांच्याकडून ढोल ताशाच्या गजरात मानवंदना देण्यात आली. तसेच मिलिंद माणके यांनी राज्याभिषेका वरील गाणे सादर केले. अद्वैत देशमुख, आराध्या बोरवके, दृष्टी, उर्वी जगताप, प्रज्ञा आणि प्रणाली पवार यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन शोभा वाढवली.

दुबईमधे होणाऱ्या पहिल्या शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी महाराजांचे १३ वे वंशज आणि आमदार छ्त्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि संभाजी ब्रिगेडचे प्रवीण दादा गायकवाड यांनी चित्रफिती मार्फत कार्यक्रमासाठी शिव-शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यासाठी शाहीर प्रा. मुकुंदा भोर पाटील डॉ. सुरज मोटे, विक्रम भोर, राहुल घोरपडे, विजय कदम, संतोष गायकवाड, विजेंद्र सुर्वे यांची प्रमुख उपस्थित होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल जगताप, रूचिरा पवार आणि पंकज आवटे यांनी केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून दुबईमधील मराठी नवउद्योजकांचा, विविध सामाजिक संस्थांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत देशमुख, विक्रम भोसले, अमोल डुबे पाटील, संदीप कड, सुनिता देशमुख, सुहास झांजे, शिवाजी काका नारुने, रघुनाथ सगळे, अक्षय माने यांनी केले. अभिजीत इगावे यांनी आभार मानले. सर्व सह सयोंजक टीम ने खुप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण CMS Live, तसेच एसजे लाईव्ह दुबई च्या माध्यमातून जगभर प्रसिद्ध करण्यात आले.

या कार्यक्रमाला दुबईमधील गिरीश पंत, सुशील मोझर, विनोद जाधव, राजेश बाहेती, अनिता महांगडे, विद्या चोरगे, अनिल थोपटे, चंद्रशेखर जाधव, आशिष जगताप, सुशांत चिल्लाल, स्वप्नील जावळे आणि संयुक्त अरब अमिराती मधील हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT