due to Israel-Hamas war loss of innocent children says un list of shame Sakal
ग्लोबल

इस्राईल -हमास ‘लज्जास्पद कृत्या’च्या यादीत; युद्धात निष्पाप मुलांच्या बळी गेल्याने ‘यूएन’चे पाऊल

या युद्धात आतापर्यंत १५ हजार ५७१ मुलांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : इस्राईल -हमास युद्धात आतापर्यंत १५ हजार ५७१ निष्पाप मुलांचा जीव गेला आहे. इस्रायली हल्ल्यांमध्ये झालेल्या या हत्या म्हणजे जगासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) सांगत इस्राईल आणि हमासचा समावेश लज्जास्पद कृत्याच्या यादीत (लिस्ट ऑफ शेम) केला आहे.

या युद्धात आतापर्यंत १५ हजार ५७१ मुलांचा मृत्यू झाला आहे. ‘यूएन’चे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांच्या कार्यालयाने सादर केलेल्या वार्षिक अहवालाशी ही यादी जोडण्यात आली आहे.इस्राईल -हमासमधील सशस्त्र संघर्षात मुलांच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे ‘द टाइम्स ऑफ इस्राईल’ने म्हटले आहे. ‘लिस्ट ऑफ शेम’मध्ये रशिया, इसिस,

अल-कायदा, बोको हराम, अफगाणिस्तान, इराक, म्यानमार, सोमालिया, येमेन आणि सीरियाचा समावेश आधीच केलेला आहे. आता त्यांच्या पंक्तीत प्रथमच इस्राईल आणि हमास संघटना आली आहे. टाइम्स ऑफ इस्राईल’ने दिलेल्या वृत्तानुसार, या यादीत समाविष्ट केलेला इस्राईल हा पहिला लोकशाहीवादी देश आहे.

हमासच्या हल्लेखोरांचे समर्थन करीत ‘यूएन’ने आज स्वतःलाच इतिहासाच्या काळ्या यादीत टाकले आहे. जगात सर्वाधिक मानवतेचे पालन ‘इस्राईल डिफेन्स फोर्स’ (आयडीएफ) करते. ‘यूएन’च्या कोणत्याही भ्रामक निर्णयाने यात बदल होणार नाही.

- बेंजामिन नेतान्याहू, पंतप्रधान, इस्राईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

Arshdeep Singh Girlfriend: अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री? एका टॅटूमुळे समोर आलं मिस्ट्री गर्लचं रहस्य, Viral Post

‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना रखडली, दीड हजार मुलींचे भवितव्य नावाच्या वादात

Latest Marathi News Live Update : जळगाव शेतकी संघाचा ‘भोंगळ’ कारभार : पोलीसांचा सौम्य लाठीचार्ज !

कतरिनाच्या गाण्यावर गौतमीचा भन्नाट डान्स, एन्ट्री स्टेप पाहून नेटकरी थक्क, Viral Video

SCROLL FOR NEXT