Due to this action of China, 65 feet wide crater in the moon
Due to this action of China, 65 feet wide crater in the moon Sakal
ग्लोबल

चीनमुळे चंद्रावर पडला ६५ फूट रुंद खड्डा

सुरज सकुंडे

सात वर्षांच्या अंतराळ प्रवासानंतर चिनी रॉकेटचा तीन टन मलबा चंद्रावर (Moon) पडला. हा तुकडा चंद्राच्या पृष्ठभागावर 5,800 मैल प्रतितास म्हणजेच ताशी 9,300 किमी वेगाने पडल्यामुळे 65 फूट रुंद खड्डा झाला. Space.com च्या रिपोर्टनुसार, ही घटना शुक्रवारी आंतरराष्ट्रीय प्रमावेळेनुसार सकाळी 7.25 वाजता घडली. परिणामी, नासाच्या (NASA) लुनर रिकॉनिसन्स ऑर्बिटरला घटनेचा आढावा घेता आला नाही. (Due to this action of China, 65 feet wide crater in the moon)

लूनर ऑर्बिटर मिशनच्या शास्त्रज्ञांनी दिली माहिती-

लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर मिशनचे उप-प्रकल्प शास्त्रज्ञ जॉन केलर यांनी द व्हर्जला एक ईमेल केला आहे की, "आम्हाला निश्चित इम्पॅक्ट क्रेटर शोधायचा आहे आणि येत्या काही काळात आम्ही तसे करण्याचा प्रयत्न करू."

सहज दिसणं कठीण-

जॉन केलर म्हणाले की 'जेव्हा हे घडले तेव्हा आम्ही प्रभाव साइटच्या जवळ नव्हतो. म्हणून आम्ही ते थेट पाहू शकलो नाही. ऑनबोर्ड कॅमेऱ्यांमध्ये विवरं शोधण्यासाठी पुरेसं रिझोल्यूशन आहे. पहिल्या आणि नंतरच्या प्रतिमांच्या प्रतिमांच्या आधारे ते पाहता येऊ शकते.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळला-

उद्ध्वस्त झालेल्या अवकाशातील या अंतराळातील मलब्याची माहिती प्लुटो प्रकल्प चालवणाऱ्या खगोलशास्त्रज्ञ बिल ग्रे यांनी प्रथम दिली होती. आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये, ग्रे यांनी यापूर्वी दावा केला होता की, हा मलबा अब्जाधीश एलोन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीच्या स्पेसएक्स रॉकेटचा आहे. परंतु नंतर मात्र ग्रेने ही वस्तू एका चिनी रॉकेटचा, विशेषतः लाँग मार्च 3C ज्याने चंद्रावर चीनची चांगई 5-T1 मोहीम सुरू केली, त्याचा अवशेष आहे, असं भाकीत केले. परंतु चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळून लावला आहे.

(स्रोत:आईएएनएस)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT