Southern Iran Earthquake esakal
ग्लोबल

जपाननंतर इराणमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; 20 लाख घरांची बत्ती गुल

सकाळ डिजिटल टीम

आज पहाटे दक्षिण इराणमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

नवी दिल्ली : आज (गुरुवार) पहाटे दक्षिण इराणमध्ये (Southern Iran) भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची (Earthquake) तीव्रता रिश्टर स्केलवर 6 इतकी मोजण्यात आलीय. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून 10 किमी खोलीवर होता. मात्र, इराणमध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीय. याआधी बुधवारी जपानमध्ये भूकंपाचे (Japan Earthquake) जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता 7.1 इतकी मोजली गेलीय.

काल (बुधवार) रात्री 8.06 वाजता जपानमध्ये 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती मीडिया रिपोर्टमध्ये देण्यात आलीय. हा भूकंप टोकियोपासून 297 किमी दूर होता. टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीनं एएफपी या वृत्तसंस्थेचा अहवाला देत म्हटलंय, जपानमधील या भूकंपामुळं देशातील सुमारे 20 लाख घरांची वीज गेलीय, असं नमूद केलंय.

जपानमध्ये रात्री भूकंपामुळं झालेल्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आलीय. यासोबतच मोठ्या प्रमाणात लोक जखमीही झाले आहेत. या भूकंपामुळं जपानमधील शिरोशी इथं बुलेट ट्रेनही रुळावरून घसरलीय. 2011 च्या आपत्तीला 11 वर्षे पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी भूकंप आलाय. पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्रानं (Pacific Tsunami Warning Center) सांगितलं की, यापुढं त्सुनामीचा धोका नाही. मात्र, जपानच्या हवामान खात्यानं कमी धोक्याचा इशारा दिलाय. टोकियोसह पूर्व जपानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याशिवाय, बुधवारी रात्री भारतातही भूकंपाचे (India Earthquake) धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरच्या उत्तरेस 119 किमी अंतरावर रात्री 9.40 च्या सुमारास जाणवले. त्याची तीव्रता 4.2 इतकी मोजली गेलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी कलाकारांची ठाकरेंच्या मेळाव्याला मोठी हजेरी – कोण कोण आले आहे?

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT