effect of the Ukraine-Russia war on India.  sakal
ग्लोबल

रशिया-युक्रेन युद्ध झाल्यास भारतावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध झालं तर भारतासह (India) जगभरातील अनेक देशांवर मोठा परिणाम होऊ शकतो.

सकाळ डिजिटल टीम

Russia-Ukraine Crisis: गेल्या काही दिवसांपासून रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) तणाव वाढला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये वाद नवा नाही. परंतु सध्या तो इतका टोकाला गेलाय की, ही दोन्ही राष्ट्रे युद्धाच्या (War) उंबरठ्यावर उभी आहेत. रशियानं जर युक्रेनवर हल्ला केला तर अमेरिका युक्रेनच्या बाजूने युद्धात उतरेल असं अमेरिकेनं (USA) म्हटलंय. जर हे युद्ध झालं तर भारतासह India) जगभरातील अनेक देशांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. या दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी इतर देशांकडून प्रयत्न सुरू आहेत.

भारताची भूमिका काय?

या दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी इतर देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत जर युक्रेन -रशियामध्ये युद्ध झाल्यास कुणाच्या बाजूने उभं राहावं हा पेच भारतापुढे उभा राहू शकतो. युद्ध झाल्यास भारत अमेरिका-युक्रेनच्या बाजूने भुमिका घेईल अशी अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली होती. परंतु या दोन्ही देशांनी चर्चेतून वाद सोडवावा अशी भुमिका भारताने मांडली आहे. (Effect of the Ukraine-Russia war on India)

युक्रेन आणि रशिया युद्धाचा भारतावर काय परिणाम होतील? (Effect of the Ukraine-Russia war on India)

युक्रेनमधील भारतीय नागरिक-

युक्रेनमध्ये सध्या 20 हजारांपेक्षा जास्त भारतीय नागरिक राहतात. यामध्ये वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या बहुतांश आहे. तसेच आयटी, फार्मा आणि इंजिनीअरिंग क्षेत्रांत नोकरी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या नागरिकांच्या सुरक्षिततेची चिंता भारताला आहे.

इंधन महागणार-

भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो. त्यावर भारताचा मोठा खर्च होतो. रशिया-युक्रेन तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या दराने प्रति बॅरल 100 डॉलर इतका उच्चांक गाठला होता. सध्या हा दर प्रति बॅरल 93 डॉलर एवढा आहे. प्रत्यक्ष युद्ध सुरु झाल्यास कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होण्याची भीती आहे. त्यामुळे भारतामध्ये महागाईचा भडका उडू शकतो.

भारताच्या संरक्षण सज्जतेवर परिणाम-

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारताच्या संरक्षण सज्जतेवरही होऊ शकतो. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची आयात करतो. भारताच्या संरक्षण दलांकडील जवळपास 60 टक्के शस्त्रे ही रशियन बनावटीची आहेत. याशिवाय रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स सिस्टीम भारताला मिळणार आहे. हे युद्ध झालं तर रशियावर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत रशियाकडून भारताला होणारा शस्त्र पुरवठा खंडित होऊ शकतो.

शेअर बाजार-

जेव्हापासून हा तणाव सुरू झालाय तेव्हापासून त्याचा मोठा परिणाम जगातील शेअर बाजारांवर झालाय. आजही शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या गुंतवणूकदारांनी शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु केली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. या परिस्थितीत जर युद्ध झालं तर गुंतवणूकदारांना मोठं नुकसान होऊ शकते.

रशिया-चीनची जवळीक डोकेदुखी ठरणार-

रशिया हा भारताचा जुना मित्र आहे. भारताच्या कठीण काळात रशिया भारताच्या पाठी भक्कमपणे उभा राहीला आहे. परंतु हे युद्ध जर झालं तर रशिया चीनकडे मदत मागू शकते. चीन आणि रशियाची ही मैत्री भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. रशिया-चीन मैत्रीमुळे भारत-चीन सीमा प्रश्नात नवा वाद होऊ शकतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT