eight former Indian Navy personnel were released from Qatar custody ESAKAL
ग्लोबल

Former Indian Navy Personnel Released: पडद्यामागील 'हिरो' अजित डोवाल; 8 माजी नौदल अधिकाऱ्यांची कशी झाली सुटका?

कतार सरकारने आठ भारतीय नौदल अधिकाऱ्यांना मुक्त केले आहे. त्यातील सात नौदल अधिकारी भारतात पोहोचले देखील आहेत. (eight former Indian Navy personnel were released from Qatar custody )

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कतारचे राजे यांच्यासोबत असलेले चांगले संबंध आणि पडद्यामागून काम करत असलेले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कुटनीती कामाला आली आहे. कतार सरकारने आठ भारतीय नौदल अधिकाऱ्यांना मुक्त केले आहे. त्यातील सात नौदल अधिकारी भारतात पोहोचले देखील आहेत. त्यामुळे गेल्या १८ वर्षांपासूनची लढाई अधिकाऱ्यांनी जिंकली आहे. (eight former Indian Navy personnel were released from Qatar custody diplomacy by National Security Advisor Ajit Doval)

कतार सरकारसोबत मुत्सद्दी चर्चा करण्याचे काम परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यशस्वीपणे करत होते. तर दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्लानुसार अजित डोवाल पडद्यामागे राहून कुशल चर्चा करत होते. हिंदूस्तान टाईम्सच्या माहितीनुसार, अजित डोवाल यांनी गेल्या काही महिन्यात अनेक दोहा दौरे केले आहेत. या दौऱ्यावेळी कतार नेतृत्वाला भारताची बाजू सक्षमपणे मांडण्याचे काम डोवाल यांनी केल्याचं कळतंय.

शिक्षा केली होती कमी

कतारच्या कोर्टाने सर्व अधिकाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावणी होती. त्यामुळे भारतीयांना धक्का बसला होता. नेमकी कोणत्या कारणासाठी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली हे कतारकडून स्पष्ट करण्यात आले नव्हते. मात्र, हेरगिरीच्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा झाल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर महिन्यात अधिकाऱ्यांची शिक्षा कमी करण्यात आली होती. यासंदर्भातील अधिक माहिती समोर आली नव्हती.

भारताचा राजनैतिक विजय

पंतप्रधान मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बीन हमेद अल-थानी यांची COP28 परिषदेच्या दरम्यान दुबईमध्ये भेट घेतली होती. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली होती. तसेच याचवेळी पंतप्रधान मोदी यांनी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या शिक्षेचा मुद्दा देखील उपस्थित केला असं सांगितलं जातं. दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली होती. एकंदरीत भारत सरकारच्या सर्व बाजूंनी केलेल्या प्रयत्नांमुळे माजी नौदल अधिकारी आज भारतात परत आले आहेत. भारत सरकारसाठी हा मोठा राजनैतिक विजय असल्याचं बोललं जातंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT