Electric Warfare Sakal
ग्लोबल

चीनचे पाऊल इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्राच्या दिशेने

दक्षिण चिनी समुद्रात अँटेना, सेन्सरचे जाळे; क्षमताविकासाचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

Global News : दक्षिण चीनच्या समुद्रात (South China Sea) अनेक अँटेना (Antenna) उभारले जात असल्याचे सध्या दिसत आहे. हे अँटेना म्हणजे आंतरराष्ट्रीय समुद्रात दळणवळण यंत्रणा वाढविण्याच्या चीनच्या प्रयत्नांचा पुरावा असून चीनच्या वर्चस्ववादी धोरणाचे उदाहरण आहे, असे ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने म्हटले आहे.

दक्षिण चिनी समुद्रावर असलेले वर्चस्व आणखी वाढविण्यासाठी चीनने आता इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र, दळणवळण यंत्रणा आणि गोपनीय माहिती मिळविण्याची क्षमता यामध्ये वाढ करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. दक्षिण चिनी समुद्राला धोरणात्मक आणि व्यूहात्मकदृष्ट्या प्रचंड महत्त्व असल्याने त्यावर वर्चस्व गाजविण्यासाठी चीन खूपच उतावीळ असल्याचे यावरून दिसत असल्याचे ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या ‘सीएसआयएस’ या संस्थेनेही चीनच्या विस्तारवादी धोरणाबाबत जगाला इशारा दिला आहे. चीनने दक्षिण चीन समुद्रात अनेक बेटांवर अँटेना उभे केले आहेत. याशिवाय, या समुद्रावरील अवकाशात अनेक उपग्रह तैनात केले आहेत. या सर्वांमागील उद्देश निश्‍चित माहिती नसल्याने चिंता व्यक्त होत असून इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्राच्या बाबतीत स्वत:ची क्षमता वाढविण्याचा चीनचा हा प्रयत्न असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

सेन्सर टॉवरचे जाळे

एका अहवालानुसार, दक्षिण चिनी समुद्रातील सुबी आणि फिअरी क्रॉस रिफ्स या कृत्रिम बेटांवर चीनने अत्याधुनिक दळणवळण आणि गोपनीय माहिती साठवून ठेवण्याची काही केंद्र उभे केले आहेत. हैनान बेट आणि पॅरासेल बेटे या दरम्यान सेन्सर टॉवरचेही जाळे चीनने निर्माण केले आहे. त्यामुळे या भागात कोणतीही इलेक्ट्रॉनिक हालचाल, म्हणजे संदेशवहन किंवा जहाजांची ये-जा झाली तरी त्याची माहिती चीनला मिळू शकणार आहे. त्यामुळे या समुद्रात चीनच्या विरोधात कोणतीही कृती करणे अशक्य होऊन बसणार आहे.

निर्णायक हल्ला करण्याची क्षमता

कोणत्याही शत्रू देशाने आक्रमण करण्याआधीच त्यांच्यावर निर्णायक हल्ला करून त्या देशाची युद्ध करण्याची क्षमताच संपवून टाकण्याइतपत स्वत:ची क्षमता विकसित करण्यासाठी चीन झपाटल्यासारखे प्रयत्न करत असल्याचे ब्रुकींग इन्स्ट्यिुशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. भविष्यात युद्ध म्हणजे केवळ बाँबस्फोट आणि गोळीबार नसेल, तर ज्या आधारावर शत्रू युद्ध करत आहे, ती यंत्रणाच निकामी करून टाकायची, असे इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्राचे एक उद्दीष्ट असते, असे या अहवालात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी भारतात आला होता कसाब? उज्ज्वल निकमांचा धक्कादायक दावा, म्हणाले...

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

SCROLL FOR NEXT