Zelensky Sakal
ग्लोबल

युक्रेनच्या आमंत्रणाला रशियाचा होकार ; शिष्टमंडळ करणार चर्चा

शियन सैन्याने युक्रेनच्या काही भागांवर कब्जा केला

निनाद कुलकर्णी

Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियन सैन्याने युक्रेनच्या काही भागांवर कब्जा केला असून, रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल होत कब्जा केल्याचे देखील सांगितले जात आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेस्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना चर्चेचे निमंत्रण पाठवले असल्याचा मोठा दावा रशियन मीडियाने केला होता. युक्रेनच्या या आमंत्रणाला रशियाने होकार दर्शवला असून, रशिया एक शिष्टमंडळ चर्चेसाठी युक्रेनला पाठवणार आहे. हे शिष्टमंडळ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांच्यासोबत चर्चा करणार आहे. (Zelensky Invites Putin For Negotiation)

भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी रवाना

भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी चेरनिव्त्सी येथून युक्रेन-रोमानिया सीमेवर रवाना झाली आहे. MEA कॅम्प ऑफिस आता पश्चिम युक्रेनमधील ल्विव्ह आणि चेरनिव्हत्सी शहरांमध्ये देखील कार्यरत आहेत. या कॅम्प ऑफिसमध्ये अतिरिक्त रशियन भाषिक अधिकारी पाठवले जात आहेत.

तत्पूर्वी युक्रेनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने शुक्रवारी देशात अडकलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे यामध्ये अनेक महत्त्वाच्या सूचना सांगण्यात आल्या असून, रोमानिया आणि हंगेरीमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचे काम भारत सरकार करत असल्याचे त्यात म्हटले आहे. युक्रेनशी चर्चा करून वाटाघाटी करण्याचे आवाहन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोनवरील चर्चेदरम्यान केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: कॅप्टनकूलने ४४ वा वाढदिवस कुटुंबासोबत केला साजरा, आई-बाबाही होते उपस्थित; Video आला समोर

Latest Maharashtra News Updates : कोथरुड येथे खिडकीतून पडणाऱ्या मुलीला जवानाने वाचवले

Viral Video: ६ चेंडू, ६ विकेट्स! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अविश्वसनीय विक्रम, इंग्लंडमध्ये घडला २४ तासांत अजब पराक्रम...

Maharashtra Assembly Session: 'ओम फट स्वाहा...' विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची टोलेबाजी; नितेश राणेंना म्हणाले...

बायकोसाठी कायपण ! नंदिनीला मनवण्यासाठी रिक्षावाला झाला जीवा; तर पार्थसाठी काव्या...; नवा प्रोमो पाहून नेटकरी खुश

SCROLL FOR NEXT